आयआयटी पवई कॅम्पसमध्ये बिबट्या शिरला

आयआयटी पवई कॅम्पसमध्ये बिबट्या शिरला असल्याची माहिती समोर आली आहे.

संग्रहित छायाचित्र

आयआयटी पवई कॅम्पसमध्ये बिबट्या शिरला असल्याची माहिती समोर आली आहे. वन नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी कॅम्पसमध्ये बिबट्य़ा शिरल्याची माहिती मिळाली. वन अधिकारी, तज्ञ आणि डॉक्टरांची टीम आयआयटी पवई कॅम्पसमध्ये दाखल झाली आहे. बिबट्या नंक्की प्रयोगशाळेत किंवा कॅम्पसमध्ये कुठे लपून बसला आहे, याची कुठलीच माहिची उपलब्ध झाली नसून, शोध सुरू आहे. कुत्र्याला पकडण्यासाठी बिबट्या कॅम्पसमध्ये शिरल्याची माहिती कंट्रोल रूमला मिळाली होती, असं वन अधिका-यांतर्फे सांगण्यात आलं आहे. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Leopard entered in iit powai campus

ताज्या बातम्या