झोपडीत शिरलेल्या बिबळ्याने झोप उडवली

येथील श्रीनगरजवळील वरीचा पाडय़ातील कृष्णा लोहारकर यांच्या झोपडीत शुक्रवारी रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास अचानक बिबळ्या शिरल्याने परिसरातील नागरिक, वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि पोलिसांची चांगलीच झोप उडाली.

येथील श्रीनगरजवळील वरीचा पाडय़ातील कृष्णा लोहारकर यांच्या झोपडीत शुक्रवारी रात्री साडेदहा-अकराच्या सुमारास अचानक बिबळ्या शिरल्याने परिसरातील नागरिक, वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि पोलिसांची चांगलीच झोप उडाली. घरातील मंडळींनी बाहेर पळ काढला. काळोखात बिबळ्याचा ठावठिकाणा समजत नव्हता. पहाटे चार वाजेपर्यंत त्याचा शोध घेतला जात होता. अखेर गवताच्या गंजीत लपलेला बिबळ्या या सर्व मंडळींच्या हातावर तुरी देऊन जंगलात पळून गेला.

    

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Leopard enters hut in thane