बिबटय़ाच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू

बारा वर्षांचा मुलगा बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना शुक्रवारी आरे वसाहतीत घडली. प्रकाश साळुंके असे या मुलाचे नाव आहे.

बारा वर्षांचा मुलगा बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना शुक्रवारी आरे वसाहतीत घडली. प्रकाश साळुंके असे या मुलाचे नाव आहे. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी अशाच एका हल्ल्यात चार वर्षांच्या चिमुरडीचा अंत झाला होता.
सहावीत शिकणारा प्रकाश   शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटल्यावर घरी परतत होता. वसाहतीतील मटाईपाडा येथील गेट क्रमांक २५ समोरून जात असतानाच बाजूच्या झाडीतून बिबटय़ाने त्याच्यावर अचानक हल्ला केला. त्यात प्रकाश जबर जखमी झाला. तेथून जात असलेल्या लहू जाधव यांनी जखमी प्रकाशला पाहिले. प्रकाशची आई लक्ष्मी साळुंके व इतरांच्या साथीने प्रकाशला तातडीने भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्रकाश मरण पावला होता असे आरे वसाहत पोलिसांनी सांगितले. १ऑक्टोबरला बिबटय़ाच्या हल्ल्यात एका चार वर्षांच्या चिमुरडीचा अंत झाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Leopard kills 12 year old boy in aarey colony

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या