आयआयटी मुंबईच्या संकुलातील मेकॅनिकल कार्यशाळेत शिरलेल्या बिबटय़ाला पकडण्यात वनाधिकारी अपयशी ठरले. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जय्यत तयारी केली होती. मात्र, वनाधिकाऱ्यांच्या हातावर तुऱ्या देऊन बिबट्या शनिवारी आयआयटीच्या परिसरातून निसटला. त्यानंतर आसपासच्या परिसरात बिबट्या नसल्याची खात्री झाल्यावर वनाधिकाऱ्यांनी मेकॅनिकल कार्यशाळेचा ताबा आयआयटी प्रशासनाकडे सोपवला . बुधवारी सकाळपासून बिबट्या आयआयटीच्या मेकॅनिकल कार्यशाळेत लपून बसला होता. त्या दिवसापासून बिबटय़ाला बाहेर काढण्याचे अथक प्रयत्न सुरू होते. अखेरचा उपाय म्हणून एका पिंजऱ्यातून वनकर्मचारी आत पाठवून बिबटय़ाला बेशुद्ध करण्याचा प्रयत्नसुद्धा वनविभागाकडून करण्यात येणार होता.