मुंबई : मुंबईत कुष्ठरोग निर्मूलनासाठी ३० जानेवारी ते १४ फेब्रुवारी या पंधरवड्यात स्पर्श मोहीम राबविण्यात येणार आहे. या काळात पालिकेचे कर्मचारी घरोघरी भेट देऊन कुष्ठरोगाचे सर्वेक्षण आणि जनजागृती करणार आहेत.

 मुंबईत दरवर्षी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत स्पर्श कुष्ठरोग मोहीम राबविली जाते. याहीवर्षी मोहिमेचे आयोजन केले असून ह्यह्णकुष्ठरोगमुक्तीकडे वाटचालह्णह्ण हे घोषवाक्य आहे. पालिकेच्या क्षेत्रातील विविध परिसरांमध्ये घरोघरी भेट देऊन कुष्ठरोगाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच पालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये जनजागृतीपर प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येणार आहे.

MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
bmc will take permission from ec for potholes filling
मुंबई: खड्डे भरण्याच्या कामासाठीही निवडणूक आयोगाची परवानगी घेणार; पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांचे सर्वेक्षण करणार

कुष्ठरोग झाला तर लपविण्याऐवजी अगर घाबरून जाण्याऐवजी त्यावर योग्य औषधोपचार तातडीने करवून घ्या. लवकर निदान व योग्य उपचारांनी कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होतो. तसेच कुष्ठबाधित व्यक्तींबाबत कोणताही भेदभाव करू नका व इतर कोणी असा भेदभाव करत असेल तर त्यांना त्यापासून परावृत्त करा. या अंतर्गत कुष्ठरोगाबद्दल माहिती देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

लक्षणे

न खाजणारा, न दुखणारा लालसर किंवा शरीरावरील त्वचेपेक्षा फिकट रंगाचा चट्टा, तेलकट गुळगुळीत लालसर त्वचा, जाड झालेल्या कानाच्या पाळया, कानावरील गाठी, अंगावरील गाठी, विरळ झालेले भुवयांचे केस, हातापायातील बधिरपणा, हातापायाला वारंवार होणाऱ्या जखमा इत्यादी.