मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वेवरून धावणाऱ्या एलटीटी – कोचुवेली गरीबरथ एक्स्प्रेसने कात टाकली असून या रेल्वेगाडीला लिके हॉफमॅन बुश (एलएचबी) डबे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे गरीबरथ एक्स्प्रेसच्या डब्यांची लांबी – रुंदी, रुंद प्रवेशद्वार, सुधारित रचनेतील बेसीन आणि शौचालय अशा बदललेल्या रुपातील रेल्वेगाडी प्रवाशांच्या सेवेत रूजू झाली आहे. त्यामुळे कोकणवासियांचा प्रवास आरामदायी होण्यास मदत होणार आहे. रविवारपासून लाल आणि करड्या रंगातील एलएचबी रेकसह गरीबरथ एक्स्प्रेस धावणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : लिव्ह इन पार्टनरची हत्या करणाऱ्याला अटक

Railways Shift from Sleeper to Air Conditioned Coaches, economy class ac coaches, Passengers Oppose Railways Shift from Sleeper to Air Conditioned coaches, Sleeper coaches, Air Conditioned Coaches, Central Railway Administration
रेल्वेगाडीचे शयनयान डबे हटवले
konkan railway coaches increased marathi news
कोकणातील रेल्वेगाड्यांचे दोन डबे वाढवले
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Mumbai vande bharat express marathi news
मुंबई: जोरदार पावसाने वंदे भारत एक्स्प्रेस रद्द, रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Mumbai local 24 years ago old video goes viral
मुंबई लोकलमध्ये २५ वर्षांपूर्वी किती गर्दी असायची? सोशल मीडियावर व्हायरल झालेला Video पाहाच
Mahalakshmi Express stuck in rain reached CST after five hours Mumbai
अखेर पाच तासांनी महालक्ष्मी एक्स्प्रेस सीएसएमटीला पोहोचली

भारतीय रेल्वेमधील प्रत्येक विभागातील जुन्या प्रकारातील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) डब्यांचे रुपांतर नव्या प्रकारातील एलएचबी डब्यात करण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणि वेगवान प्रवास होण्यासाठी एलएचबी डबे महत्त्वाचे आहेत. कोकण रेल्वेमधील अनेक रेल्वेगाड्यांना एलएचबी डबे जोडण्यात येत आहेत. आता गाडी क्रमांक १२२०२ कोचुवेली – एलटीटी गरीबरथ एक्स्प्रेस रविवारपासून आणि गाडी क्रमांक १२२०१ एलटीटी – कोचुवेली गरीबरथ एक्स्प्रेस सोमवारपासून अत्याधुनिक एलएचबी रेकसह धावणार आहे. गरीबरथ एक्स्प्रेला पूर्वी १५ डबे होते. तर, आता या एक्स्प्रेसला २१ डबे जोडले जाणार आहेत. यात १६ तृतीय श्रेणी वातानुकूलित इकाॅनाॅमी डबे, ३ वातानुकूलित चेअर कार डबे, २ जनरेटर कार असे डबे असतील. गरीब रथ एक्स्प्रेसच्या एलएचबी डब्यांची बांधणी स्टीलने केली असून आत ॲल्युमिनिअमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वेगाडीचे वजन कमी होणार असून एक्स्प्रेसचा वेगही वाढवण्यास मदत होणार आहे. तसेच एलएचबी डबे ॲण्टी टेलिस्कोपिक पद्धतीचे असून त्याचे वजन साधारण ३९.५ टन वजन आहे. त्यामुळे अपघाताच्या वेळी हे डबे उलटण्याची शक्यता कमी असते. एखाद्या वेळी अपघात झाल्यास जीवितहानी कमी होण्याची शक्यता असते, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.