scorecardresearch

चिंचपोकळीजवळ लोकल ट्रेनचा डबा घसरला, मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम

सीएसटीकडे जाणारी जलद वाहतूक दादरपासून धीम्या मार्गावर वळवली आहे.

local train
संग्रहित छायाचित्र

चिंचपोकळीजवळ यार्डात रिकाम्या लोकल ट्रेनचा एक डबा रूळावरून घसरला. त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. रिकाम्या लोकलचा डबा निखळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहे. मुंबई, सीएसटीकडे जाणारी जलद वाहतूक दादरपासून धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे.
करीरोड-चिंचपोकळी दरम्यान १५ डब्यांची लोकल अडकल्यामुळे जलद वाहतूक विस्कळीत झाली आहे. गेल्याच आठवड्यात मुंबईहून हैदराबादकडे जाणाऱ्या हुसेनसागर एक्स्प्रेसचे दोन डबे सीएसटी स्थानकात घसरले होते. माझगाव यार्डमधून ही गाडी सीएसटी स्थानकात येत होती. त्यावेळी हा अपघात झाला होता. सुदैवाने गाडीत कोणीही नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. या अपघातामुळे ही गाडी सुमारे सहा तास उशिराने धावली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-10-2016 at 15:41 IST

संबंधित बातम्या