मुंबईसह परिसरात पहाटेपासून पडत असलेल्या पावसाचा फटका काही प्रमाणात मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेला बसला आहे. लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने सुरू असल्याने कामावर जाणाऱ्यांना विलंब होत आहेत. मंगळवारपासून मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्लेषण : पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर पाणी का साचते?

विश्लेषण : पावसाळ्यात लोकल सेवा का कोलमडते

मुंबई महानगराला सोमवारी पावसाने चांगलेच झोडपले. दुपारपासून पडलेल्या पावसामुळे दृश्यमानता कमी झाली. त्यामुळे लोकल चालवताना मोटरमनला अडचणी आल्या आणि लोकलचा वेग मंदावला. परिणामी लोकल वेळापत्रक विस्कळीत झाले होते. तीच परिस्थिती मंगळवारी मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याण, हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर आहे.

पाहा व्हिडीओ –

पावसामुळे मध्य रेल्वेवरील लोकल पंधरा मिनिटे उशिरा धावत आहेत. हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलही दहा मिनिटे विलंबाने होत आहेत. त्यामुळे लोकल गाड्यांना गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला, विद्याविहार, सायन यासह काही स्थानकांच्या बाहेर, तर रुळांच्या आजूबाजूलाही पाणी साचले आहे. पाऊस दिवसभर सुरु राहिल्यास लोकल वेळापत्रक आणखी विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local train services delayed due to heavy rain in mumbai mumbai print news asj
First published on: 05-07-2022 at 10:02 IST