scorecardresearch

Premium

कर्मचाऱ्यांमध्ये ‘व्हायरस’चीच चर्चा

लंच टाइम आटोपून मंत्रालयातील कर्मचारी आपापल्या कक्षात जाऊ लागले, तेव्हा चर्चेला जोर आला होता.

कर्मचाऱ्यांमध्ये ‘व्हायरस’चीच चर्चा

मंत्रालयातील संगणकीय प्रणालीवरील विषाणूचा सार्वजनिक बांधकाम, महसूल विभागाला फटका
लंच टाइम आटोपून मंत्रालयातील कर्मचारी आपापल्या कक्षात जाऊ लागले, तेव्हा चर्चेला जोर आला होता. ‘सिस्टीम’मध्ये व्हायरस शिरला आहे आणि युद्धपातळीवर सिस्टीमची सफाई सुरू झाली आहे, एवढेच तोवर त्यांच्या कानावर आले होते. त्यामुळे सूचक हसत अनेकजण एकमेकांना टाळ्या देत होते. हे कधी तरी होणारच होते, अशीही कुजबुज सुरू झाली. सगळ्यांच्या नजरा मंत्रालयातील महसूल खात्याकडे लागल्या होत्या. या खात्यात संगणकीकरणाचा धूमधडाका सुरू होता. त्यामुळे तेथे एखाद्या सिस्टीममध्ये व्हायरस आला असावा, असा तर्कही काहींनी बांधला. पण काहींनी लगेचच तो धुडकावून लावला. सगळी सिस्टीमच खराब झाली आहे, असा शेराही कुणी तरी मारला. मंत्रालयाच्या मजल्यामजल्यावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जनताजनार्दनाच्या कानावरही ही कुजबुज पडली, पण कुणाच्याच चेहऱ्यावर आश्चर्य दिसत नव्हते. ही बाब एवढय़ा उशिरा कशी समजली, असा सवाल ग्रामीण महाराष्ट्रातून आलेल्या एका ग्रामस्थाने भोळसटपणे एका कक्षातील कर्मचाऱ्याकडे केला, तेव्हा कसेबसे हसून त्या कर्मचाऱ्याने मान वळविली.गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयातील यंत्रणेच्या कर्तबगारीच्या कहाण्या जगजाहीर होत होत्या. लाचलुचपत खात्याचे कर्मचारी तर गुप्तपणे मजल्यामजल्यावर पाळत ठेवून असल्याची चर्चा होती. संध्याकाळी सारा प्रकार स्पष्ट झाला. मंत्रालयातील संगणक यंत्रणेत विषाणू संसर्ग झाला, आणि त्यामुळे यंत्रणा थंडावली, हे समजताच अनेक कर्मचाऱ्यांचा जीव भांडय़ात पडला.
लॉकी रॅन्सम काय आहे?
व्हायरस आकर्षक माहिती देणाऱ्या ई-मेल्सच्या माध्यमातून संगणकात प्रवेश करतो. त्यानंतर दहा मिनिटांच्या आत संपूर्ण संगणक लॉक होतो. तसेच संगणकातील सर्व माहिती एनक्रिप्टेड होते. या एनक्रिप्टेड माहितीची चावी व्हायरस सोडणाऱ्याच्या सव्‍‌र्हरवर असते अशी माहिती क्विकहील टेक्नॉलॉजीचे सीओओ संजय काटकर यांनी दिली.

लॉकी रॅन्सम नावाच्या व्हायरसने गेल्या चार दिवसांपासून मंत्रालयात धुमाकूळ घातला आहे. मेलच्या माध्यमातून या व्हायरसने मंत्रालयातील सुमारे दीडशे संगणकांवर हल्ला केला असून त्याचा सर्वाधिक फटका सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागास बसला आहे.
लॉकी रॅन्सम नावाचा व्हायरस मंत्रालयातील अनेक संगणकांमध्ये आढळून आला आहे. जी मेलच्या माध्यमातून हा व्हायसर संगणकांमध्ये पसलत आहे. त्यामुळे मेल ओपन करताच डेस्कटॉपवर पैसे भरण्याचा संदेश येतो. हा संदेश ओपन करताच संगणक लॉक होतो.
मंत्रालयातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जीमेलच्या माध्यमातून ज्यांच्या संपर्कात आहेत त्यांनाही या व्हायरसचा फटका बसत असून गेल्या तीन-चार दिवसात अशा प्रकारे १५० संगणक बंद पडले आहेत. या व्हायसरमुळे सार्वजनिक बांधकाम आणि महसूल विभागातील संगणक बंद पडल्याने महत्वाची माहिती मिळत नसल्याने अधिकारी- कर्मचारी हवालदिल झाले असून आता हा व्हायरस काढण्याचे काम तंत्रज्ञांनी सुूर केले आहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Anil Parab Supreme Court Rahul Narwekar
“सर्वोच्च न्यायालयाच्या खालचं विधानसभा अध्यक्षांचं न्यायालय प्रत्येक आमदाराची…”, अनिल परबांचं मोठं विधान
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त

मुख्यमंत्र्यांचे उपाययोजनेचे आदेश
गेल्या काही दिवसांत काही अधिकाऱ्यांना सापळ्यात पकडल्याने सिस्टीममधील व्हायरस म्हणून सुरू असलेल्या चर्चेचा त्याच्याशीच काहीतरी संबंध असावा, असाही तर्क काहीजण करू लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर मंत्रालयातील बिघडलेली सिस्टीम ताळ्यावर आणण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिल्याचीही चर्चा होती. त्यामुळे, आज अचानक सिस्टीममध्ये शिरलेला व्हायरस आणि सफाई मोहीम असे शब्द कानावर पडताच अनेकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Locky ransom virus hits maharashtra mantralaya computers

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×