मुंबई : कडक उन्हामुळे मुंबई, ठाण्यात मतदारांनी सकाळी सुरुवातीच्या दोन तासांतच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. दुपारी १२ ते ३ या काळात काही मतदान केंद्रांवर शुकशुकाट होता.

कडक उन्हामुळे सर्वच उमेदवारांनी सकाळी लवकर मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले होते. यानुसार मुंबई, ठाण्यातील मतदान केंद्रांवर सकाळीच रांगा लागल्या होत्या. एरव्ही सकाळी ७ ते ८ या वेळेत मतदानासाठी फारशा रांगा नसतात. पण अनेक मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. मतदार सकाळीच बाहेर पडल्याचे चित्र होते.

29 Flamingos hit by plane marathi news
मुंबई: विमानाच्या धडकेमुळे फ्लेमिंगोंचा मृत्यू
voting process delayed deliberately allegation by uddhav thackeray on election commission
निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा; उद्धव ठाकरे यांचा आरोप
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates in Marathi
Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Updates : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
people in redevelopment project missing from the voter list
Lok Sabha Polls Phase 5 : पुनर्विकास प्रकल्पातील अनेकांची नावे मतदार यादीतून गायब!
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!

मुलुंड, बोरिवली, विलेपार्ले, घाटकोपर, दादर आदी ठिकाणी मतदारांनी सकाळीच मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. सकाळीच मोठ्या प्रमाणावर मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याने मतदानाची टक्केवारी वाढेल, असा अंदाज वर्तविला जात होता. पण जस जसा सूर्य तळपत गेला तसे मतदानाची टक्केवारी घसरली. सकाळी ११ ते ११.३० पर्यंत मतदानासाठी गर्दी होती. पण दुपारी १२ नंतर मतदानाचे प्रमाण कमी झाले. १२ ते ३ या काळात काही केंद्रांवर फारच कमी मतदान झाल्याचेही निदर्शनास आले. सायंकाळी ४ नंतर मतदानासाठी पुन्हा रांगा लागण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा >>> Lok Sabha Polls Phase 5 : पुनर्विकास प्रकल्पातील अनेकांची नावे मतदार यादीतून गायब!

पाचनंतर काही मतदान केंद्रांवरील गर्दी वाढली होती. सकाळी ७ ते ११ पर्यंत राज्यात सरासरी १६ टक्के तर दुपारी १ पर्यंत २७ टक्के मतदान झाले होते. ११ ते १ या दोन तासांच्या काळात ११ टक्के मतदानात वाढ झाली होती. दुपारी ३ पर्यंत ३९ टक्के तर सायं. पाचपर्यंत ५० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते.

उत्तर मध्य मुंबईत भर दुपारी मतदारांच्या रांगा

मुंबई : उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सकाळी उत्साहात मतदानाला प्रारंभ झाला. विलेपार्ले, कुर्ला- नेहरूनगर, वांद्रे, पूर्व आणि पश्चिम परिसरातील मतदान केंद्रावर दुपारपर्यंत मतदारांच्या लांबलचक रांगा होत्या. त्यामुळे मतदारांना सुमारे दोन तास रांगेत थांबावे लागले. पवईतील हिरानंदानी बूथ क्रमांक २७ मधील ईव्हीएम सकाळी साडेअकराच्या सुमारास बंद पडले. अभियंते येईपर्यंत तासभर मतदानाचा खोळंबा झाला. आम्ही लगेचच पर्यायी ईव्हीएम यंत्राची व्यवस्था केली, असा दावा निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी केला. पवईतील २७ व २८ या केंद्रांवरची यंत्रे दोन तास बंद होती. मला दोन तास रांगेत थांबावे लागले, असा संताप अभिनेता आदेश बांदेकर यांनी केला. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी सकाळी ८ वाजता आपल्या आईसह धारावीतील काळा किल्ला केंद्रावर मतदान केले. यावेळी त्यांनी संविधानाची प्रत बरोबर घेतली होती. तर अॅड. उज्ज्वल निकम यांनी सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी दादर येथील वुलन मिल मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

महिला मतदारांना तुळशीची रोपे

मुंबई: जास्तीत जास्त महिलांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने काही मतदान केंद्रांवर महिलांना मतदानानंतर तुळशीची रोपटी भेट देण्यात आली. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील १७३ क्रमांकाच्या चेंबूर एज्युकेशन सोसायटी शाळेच्या मतदान केंद्रावर सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते. तेथे मतदान करून आलेल्या महिलेला बंदोबस्तावरील पोलिसांच्या हस्ते तुळशीचे रोप भेट देण्यात येत होते.

आचारसंहिता भंगप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल

मुंबई : आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. मद्याच्या बाटल्यांसह एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे, तर साबुसिद्दिक रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर धर्माच्या आधारे मतदान करण्याचे आवाहन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच प्रचार संपल्यानंतरही समाजमाध्यमांद्वारे प्रचार केल्याप्रकरणी पोलिसांनी मोहसिन हैदर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उत्तर मुंबईत मतदान यंत्रे बंद पडल्याच्या तक्रारी

मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मतदारयादीतून नावे गायब झाल्याच्या तुरळक तक्रारी होत्या, तर बोरिवली व दहिसर पूर्वमधील केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने काही वेळ मतदारांचा खोळंबा झाला. दहिसर पूर्व येथील विभूती नारायण विद्यामंदिर आणि बोरिवलीतील बाभळी महापालिका शाळा येथे दुपारच्या वेळेत ईव्हीएम यंत्रे बंद पडल्याच्या तक्रारी नागरिकांकडून उमेदवार पीयूष गोयल यांच्याकडे करण्यात आल्या. अनेक केंद्रांवर पिण्याचे पाणी, आजारी, वयोवृद्ध मतदारांसाठी व्हील चेअर अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली.