मुंबई: सामान्य स्त्रिया संकटांशी दोन हात करत आपले ध्येय कसे गाठतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही कशा प्रगतिपथावर आणतात, याच्या नऊ असामान्य कहाण्या उलगडणारा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’ सोहळा ‘एबीपी माझा’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या या समारंभात साजरा करण्यात आलेला ज्येष्ठ कवयित्री शान्ता शेळके  यांच्या कविता व गीतांचा शब्दोत्सव हेही या प्रक्षेपणाचे एक आकर्षण ठरेल.

आज दुपारी ४ वाजता ‘एबीपी माझा’ वाहिनीवर हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी ‘लोकसत्ता’च्या चतुरंग पुरवणीत समारंभाचे विस्तृत वार्तांकनही वाचायला मिळणार आहे. लोकसत्ता दुर्गा’ उपक्रमाअंतर्गत दरवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या नऊ स्त्रियांचा गौरव केला जातो. या पुरस्कारांचे हे आठवे वर्ष आहे.

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

मुंबईत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ येथे झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांमधून निवडलेल्या नऊ ‘दुर्गां’चा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने आणि ऊर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच याप्रसंगी ज्येष्ठ नृत्यांगना व नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांना ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले.

याच समारंभात शान्ता शेळके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘जीवनगाणी’ संयोजित शब्दोत्सव सादर करण्यात आला. यात प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, मधुरा वेलणकर आणि अनुश्री फडणीस यांनी शान्ता शेळकेंच्या निवडक कवितांचे वाचन के ले, तर केतकी भावे, सोनाली कर्णिक आणि मंदार आपटे यांनी शान्ताबाईंच्या लोकप्रिय गीतांचे सादरीकरण के ले. कार्यक्रमाचे निवेदन अभिनेत्री हेमांगी कवी यांनी के ले. उत्तरोत्तर रंगत गेलेला हा कार्यक्रम शनिवारी रसिकांना दूरचित्रवाणीवर पाहता येईल.

मुख्य प्रायोजक : ग्रॅव्हीटस फाऊंडेशन

सहप्रायोजक :   महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळ,   व्ही. पी. बेडेकर अ‍ॅँड सन्स प्रा. लि.     सनटेक रिअल्टी लि.    बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि.

पॉवर्ड बाय :  प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी,  शिवाजीनगर, पुणे, राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.

टेलिव्हिजन पार्टनर :   एबीपी माझा