मुंबई : समाजातील घडामोडींवर भाष्य करण्याची आपली परंपरा यंदाही ‘लोकप्रभा’च्या दिवाळी अंकाने कायम राखली असून यंदाही वाचनीय अशा लेखांनी हा अंक सजला आहे. लडाखच्या हक्कांसाठीच्या सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या लढ्याचा पश्मीना शालींशी काय संबंध आहे, चीनचा विस्तारवाद आणि भारत सरकारचा विकासवाद यामुळे पश्मीनाच्या साखळीतील पहिली कडी असणाऱ्या चांगपा जमातीपुढे कोणती आव्हाने उभी राहिली आहेत, याचे विवरण विजया जांगळे यांच्या ‘विरलेले धागे…पश्मीनाचे’ या लेखात वाचायला मिळते. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांच्यासाठी अवकाशात अडकल्यानंतर तगून राहणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या किती खडतर आहे, याची माहिती अमोल परांजपे यांनी ‘दोन शास्त्रज्ञ त्रिशंकू होतात तेव्हा…’ या लेखात दिली आहे. यंदा प्रथमच संसदेत निवडून गेलेल्या चंद्रशेखर आझाद यांचा संघर्षमय प्रवास महेश सरलष्कर यांनी ‘मैं आज़ाद हूँ!’ या लेखात कथन केला आहे. बलुचिस्तानच्या लढ्याचा चेहरा ठरलेल्या माहरंग बलोच यांचे व्यक्तिमत्त्व ‘लढवय्यी माहरंग!’ या लेखात वैशाली चिटणीस यांनी चित्रित केले आहे. जंगलात लपून गुप्तपणे रेडिओ वाहिनी चालवून गोवा मुक्तिसंग्रामात मोलाचे योगदान देणाऱ्या लिबिया लोबो यांचा संघर्ष किशोर अर्जुन यांनी ‘गोंयचे सोडवणेचों आवाज’ या लेखात वर्णिला आहे.

नक्षलग्रस्त भागात बातमीदारी करताना भेटलेल्या व्यक्तींविषयीचे अनुभव देवेंद्र गावंडे यांनी ‘नक्षलग्रस्त भागातील पत्रकारिता’ या लेखात कथन केले आहेत. तर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भविष्यातील आरोग्यव्यवस्थेत कोणते बदल होऊ शकतील याचा वेध डॉ. उज्ज्वला दळवी यांनी ‘भविष्याच्या चाहूलवाटा’ या लेखात घेतला आहे. आशुतोष उकिडवे यांनी ‘विमुक्तांचे लावण्यालंकार’ या लेखात भटक्यांच्या दागिन्यांची वैशिष्ट्ये उलगडून दाखविली आहेत. पाकिस्तानी मालिका भारतात लोकप्रिय का आहेत, याचे विश्लेषण निमा पाटील यांनी ‘सरहद के उस पार…’ या लेखात केले आहे. धात्री श्रीवत्स यांनी ‘वाईट्टं असं काही’ या लेखात एकेकाळी फ्लॉप ठरलेल्या पण आता कल्ट मानल्या जाणाऱ्या दिग्दर्शक एडवर्ड वूड यांची ओळख करून दिली आहे. तर मृणाल भगत यांनी ‘फास्ट फॅशन… पडद्यामागचे वास्तव’ लेखात फास्ट फॅशन या ट्रेण्डचा ऊहापोह केला आहे. सिद्धार्थ केळकर यांचा जगणे ‘गाणे आहे सारे!’ हा लेख म्हणजे दर्जेदार हिंदी गीतविश्वाची सफर आहे, तर मुकुंद संगोराम यांचा ‘आनंद मिळवू या… वाढवू या…’ लेख बदलत्या सणांविषयी मार्मिक टिप्पणी करतो. आदित्य निमकर यांचा ‘आत्मोन्नतीचे नगर’ लेक आरोव्हीलची सफर घडवून आणतो, तर राधिका टिपरे यांचा हिमालयातील ‘तपकिरी अस्वलांच्या शोधात…’ हा लेख उत्सुकता चाळवतो. सोनल चितळे यांनी भविष्यवेध घेतला आहे.

loksatta Diwali ank
दर्जेदार, वाचनीय साहित्याचा ‘दिवाळी फराळ’, ‘लोकसत्ता’ दिवाळी अंक प्रकाशित
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Loksatta editorial Donald Trump won US presidential election
अग्रलेख: तो परत आलाय…
loksatta editorial on aliens
अग्रलेख : ‘तारे’ तोडण्याचे तर्कट!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

हेही वाचा : मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे

मुखपृष्ठाविषयी…

अंकाच्या मुखपृष्ठावर केरळमधल्या त्रिचूर येथील प्राचीन ‘वदक्कनाथम्’ मंदिरातील त्रिसूर पूरम उत्सवाचे पंकज बावडेकर यांनी रेखाटलेले चित्र आहे. केरळमधील दुर्गा किंवा काली मंदिरात साजऱ्या होणाऱ्या या उत्सवाला दरवर्षी संपूर्ण आशियातून लाखो भाविक उपस्थित राहतात. सजवलेल्या हत्तींची मिरवणूक आणि वाद्यामेळ्याचं सादरीकरण हे या उत्सवाचे वैशिष्ट्य असते.

Story img Loader