मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक मृत्यू हे हृदयविकारामुळे होत असून मृत्यू टाळण्यासाठी पहिल्या एक ते दोन तासांत योग्य उपचार वेळेत न मिळाल्यामुळे होतात. हृदयविकाराची लक्षणे, तातडीचे प्रथमोपचार, करोनानंतर हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे बुधवारी मार्गदर्शन करणार आहेत.

जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने बुधवारी (२९ सप्टेंबर) आयोजित केलेल्या ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या वेबसंवादात ‘ठणठणीत हृदयासाठी’ या विषयावर डॉ. मुळे वाचकांशी संवाद साधणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक मृत्यू हे हृदयविकारामुळे होत असून बहुतांश हृदयाशी संबंधित आजार हे टाळता येणे शक्य आहे. तंबाखू किंवा मद्याचे व्यसन, निकृष्ट दर्जाचा आहार, स्थूलपणा इत्यादी बाबी हृद्यविकारासाठी प्रामुख्याने कारणीभूत आहेत. तेव्हा हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी राहणीमानासह सवयींमध्ये काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. अंगवळणी पडलेल्या या चुकीच्या सवयी कशा बदलता येतील, सवयी बदलण्याचे काय फायदे आहेत यासह जीवनशैलीत काय बदल करणे आवश्यक आहे याचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. वाचकांना हे मार्गदर्शन मिळण्यासाठी लोकसत्तातर्फे बुधवारी ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या वेबसंवादाचे आयोजन केले आहे.

हृदयविकारांचे निदान वेळेत झाल्यास समुपदेश आणि उपचारही लवकर सुरू केले जातील. शरीर हृदयावर ताण येत असल्याचे संकेत देत असते. परंतु आपल्याला हे संकेत लक्षात येत नाहीत आणि दुर्लक्ष केले जाते. हे संकेत म्हणजेच लक्षणे कोणती आहेत हे समजणेही अत्यंत गरजेचे आहे. या विषयी डॉ. मुळे या वेबसंवादात संवाद साधणार आहेत.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येथे नोंदणी आवश्यक.

http://tiny.cc/LS_Aarogyamaanbhav_29Sep

कधी ? :  बुधवार, २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता

ऑनलाइन सहभागासाठी..या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागासाठी क्यूआर कोडचा वापर करता ये??.