ज्येष्ठ नाट्यकर्मी महेश एलकुंचवार यांच्याहस्ते उद्घाटन झालेल्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ला आजपासून झोकात सुरुवात झाली. लिटफेस्टच्या सुरुवातीलाच महेश एलकुंचवार यांची सविस्तर मुलाखत झाली. आजपासून प्रत्यक्ष कार्यक्रमांना सुरुवात झाली. रविंद्र नाट्य मंदिर येथे सकाळी ७ ते १० या वेळेत ‘गीत स्वानंद’ या कार्यक्रमाने लिटफेस्टला सुरुवात झाली. त्यानंतर सुप्रसिद्ध कवयित्री अरुणा ढेरे यांच्या कविता सादरीकरणाने उपस्थित रसिकांना पूर्णपणे काव्यमय केलं. १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर असा ८ दिवस लिटफेस्टचा भरगच्च कार्यक्रम असणार आहे.

पहिल्या दिवसाचे कार्यक्रम

ज्येष्ठ बासरीवादक रोणू मजुमदार यांच्या सानिकेचे सूर आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. अश्विनी भिडे- देशपांडे यांच्या गायनाने ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ची सुरुवात झाली. त्यानंतर ‘मी आणि माझी कविता’ या एकरंगी काव्यसत्रात अरुणा ढेरे यांच्याकडून अनेक कवींच्या अनेकरंगी कवितांच्या रसग्रहणाची संधी आज रसिकांना मिळाली. यानंतर दुपारच्या सत्रात ‘उद्याचे लेखक घडताना’ या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं असून आजच्या दिवसाची सांगता गीतकार, गायक, संगीतकार स्वानंद किरकिरे यांच्या ‘गीत स्वानंद’ कार्यक्रमाने होईल. या सर्व कार्यक्रमांसाठी रसिक प्रेक्षकांना विनामूल्य प्रवेश असेल.

दुसऱ्या दिवसाचे कार्यक्रम

दुसऱ्या दिवसाची म्हणजेच २ नोव्हेंबरच्या कार्यक्रमांची सुरुवात सकाळी १० वाजता बेगम परवीन सुलताना व रोंकिनी गुप्ता यांच्या ‘दोन पिढ्यांची स्वरभाषा’ या गायन सत्राने होईल. त्यानंतर चित्रकार निलेश जाधव रसिकांना ‘गोष्टीतून चित्र’ उलगडण्याच्या कलेविषयी माहिती देतील. दुपारी ३ वाजता ‘ऑल द बेस्ट’ नाटकाचा प्रयोग असेल. त्याचवेळी दुसरीकडे ‘दास्तान-ए-रामजी’, ‘गीत हे कविता असते का?’, ‘भूरा नंतरचे बाविस्कर’ या चर्चासत्रांचं आयोजन असेल. दुसऱ्या दिवसाची सांगता संध्याकाळी ७.३० वाजता मंदार पिलवलकर यांच्या मराठी मुशायराने होईल.

तिसऱ्या दिवसाचे कार्यक्रम

सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात लिटफेस्टच्या तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी ११ वाजता ‘साहित्य आणि मनाचे आरोग्य’ हे सत्र, संध्याकाळी ४ वाजता कवी वैभव जोशी यांचे ‘कवीची कार्यशाळा’ हे सत्र तर पूर्ण दिवसभर अत्रे सभागृहाच्या बाहेर पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात येतील.

चौथ्या दिवसाचे कार्यक्रम

चौथ्या दिवसाची सुरुवात सकाळी ११ वाजता कलाकार यश वेलणकर यांच्या ‘सेल्फ हेल्प ऑथर इंटरॅक्शन’ सत्राने होईल. संध्याकाळी ४ वाजता सॅबी परेरा व मंदार भारदे यांचं ‘आजच्या काळातील विनोदी लेखन’ या विषयावर सत्र होईल. चौथ्या दिवसाची सांगता गिरीश कुलकर्णी व माधुरी पुरंदरे यांच्या ‘रुंगली रुंगलीयोत’ या सत्राने होईल.