‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रम शुक्रवारी मुलुंडमध्ये

निश्चलनीकरण आणि पर्यायाने रोकडरहित व्यवस्थेकडील वाटचाल आणि आता ‘एक देश, एक कर’ रूपी ‘जीएसटी’ या नव्या करप्रणालीकडील संक्रमणाने देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे फरबदल सुरू आहेत. यातून सर्वसामान्यांनी गुंतवणूक केलेल्या पैशाचे भवितव्य बदलणेही स्वाभाविक आहे. आपल्या पैशाची भविष्यात वृद्धी होईल तर ती कशी या सर्वसामान्यांना पुढे असणाऱ्या प्रश्नाचे समाधान ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमातून तज्ज्ञ सल्लागारांद्वारे केले जाणार आहे.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार

‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत गुंतवणूकदार मार्गदर्शनाचे ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चे हे सत्र येत्या शुक्रवारी, ७ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता महाराष्ट्र सेवा संघ, अपना बाजाराच्या बाजूला, एम. एस. संघ मार्ग, मुलुंड (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आले आहे. बदलत्या आर्थिक परिमाणांतून निर्माण झालेल्या कुटुंबाच्या अर्थनियोजन आणि गुंतवणूकविषयक शंकांचे निवारण करण्याचा हा एक प्रयत्न आहे.

शेअर बाजारातील तेजी अव्याहत सुरू असून, निर्देशांकांनी विक्रमी शिखर गाठले आहे. दुसरीकडे रिझव्‍‌र्ह बँकेने महागाई दरात वाढीचा इशारा देत व्याज दरात कपातीला लगाम घातला आहे. प्रत्यक्षात  बँकांच्या मुदत ठेवी आणि अल्पबचत योजनांच्या लाभाला यातून उतरती कळा लागली आहे. अशा स्थितीत गुंतवणुकीच्या सुयोग्य पर्यायांची मांडणी या कार्यक्रमातून केली जाईल. गुंतवणुकीच्या माध्यमातून कुटुंबाच्या आर्थिक नियोजनाचा विषय अर्थसल्लागार कौस्तुभ जोशी हे समजावून देतील, तर ‘लोकसत्ता-अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक वसंत माधव कुलकर्णी हे सध्याच्या काळात म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणुकीच्या पर्यायाचा ऊहापोह करतील.

कार्यक्रमाला उपस्थित गुंतवणूकदारांना त्यांच्या मनांतील प्रश्न थेट तज्ज्ञ वक्त्यांना विचारून त्याचे समाधान करून घेता येईल. कार्यक्रमाला प्रवेश सर्वासाठी खुला आणि विनामूल्य आहे. तथापि सभागृहाच्या आसनक्षमतेनुरूप प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.

कधी?

शुक्रवार, ७ जुलै २०१७, सायं. ६.०० वा.

कुठे?

महाराष्ट्र सेवा संघ, अपना बाजाराच्या बाजूला, एम.एस. संघ मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई.

तज्ज्ञ मार्गदर्शक

* करावे अर्थनियोजन:  कौस्तुभ जोशी

* म्युच्युअल फंड आणि शेअर

गुंतवणुकीचा मेळ : वसंत माधव कुलकर्णी

Disclaimer: Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.