‘लोकसत्ता अर्थब्रह्म’च्या प्रकाशनानिमित्त दादरमध्ये गुरुवारी परिसंवाद
मुंबई : जुन्या पद्धती मोडून काढल्या जात आहेत; कृत्रिम प्रज्ञा अर्थात एआयमुळे अनेक पारंपरिक व्यवसाय लयाला चालले आहेत. याचीच चिंता म्हणून आज शेअर बाजारातही कमालीचे अस्थिरतेचे वातावरण आहे. अशा समयी गुंतवणूकदारांना त्यांचा पैसा कुठे वळवावा, असा प्रश्न सतावत आहे. याचेच उत्तर येत्या गुरुवारी सायंकाळी दादरमध्ये होत असलेल्या परिसंवादातून मिळविता येईल.
गुंतवणुकीच्या नवक्षितिजांचा वेध घेणार्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिक अंकाच्या २०२६-२७ च्या आवृत्तीच्या प्रकाशनानिमित्ताने हा कार्यक्रम होत आहे. गुरुवार, ५ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजता, बी. एन. वैद्य सभागृह, हिंदू कॉलनी, दादर (पूर्व) येथे हा कार्यक्रम योजण्यात आला आहे.
शेअर बाजार कधी अचानक वर जातो, तर कधी धाडकन खाली कोसळतो. समुद्रातील खवळलेल्या लाटांसारखे वादळी चढ-उतार हे सोने-चांदी यांसारख्या धातूंच्या किमतीतही सुरू आहेत. पेचात पाडणारी ही अस्थिरता धोक्याची घंटा आहे की संधी? याचा भविष्यवेध यानिमित्ताने वस्तू बाजार विश्लेषक श्रीकांत कुवळेकर आणि आर्थिक नियोजनकार कौस्तुभ जोशी यांच्याकडून घेतला जाईल.
सोने-चांदीची स्थिरता आणि तांब्यासारख्या औद्योगिक धातूंची साथ, आपली गुंतवणुकीची नौका बुडू देणार नाही. फक्त गरज आहे ती शिस्तबद्ध नियोजनाच्या सुकाणूची! हे गणित कसे सोपे आणि सहजशक्य करता येईल त्याचा वेध ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’चा अंक आणि त्यानिमित्ताने होत या परिसंवादातून घेऊ या.
या नि:शुल्क कार्यक्रमात उपस्थितांना त्यांचे आर्थिक नियोजन तसेच गुंतवणूकविषयक प्रश्न-शंका हे तज्ज्ञ वक्त्यांना विचारता येतील. बरोबरीने अर्थब्रह्मचा वार्षिक अंकही सवलतीच्या दरात विकत घेता येईल.
अर्थब्रह्म २०२६-२७ : गुंतवणुकीचे नवक्षितिज
वक्ते
श्रीकांत कुवळेकर
(वस्तू बाजाराचे विश्लेषक)
कौस्तुभ जोशी
(आर्थिक नियोजनकार)
कधी : गुरुवार, ५ मार्च २०२६, सायंकाळी ६.१५ वाजता
कुठे : बी. एन. वैद्य सभागृह,
हिंदू कॉलनी, दादर (पूर्व)
इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी – ९९२००९९९४३ अथवा (०२२) ६७४४०३९०/ ६७४४०२१५ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
अस्वीकरण: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, सर्व योजनांसंबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.
कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी खुला असून, प्रथम येणार्यास प्राधान्य असेल.
