करिअर वाटांसाठी तज्ज्ञांचा सल्ला

२१, २२ आणि २३ जुलैला हा कार्यक्रम होणार आहे.

आजपासून ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ मार्गदर्शन कार्यक्रम
मुंबई : योग्य ज्ञानशाखा कशी निवडायची, उच्चशिक्षणातील योग्य अभ्यासक्रम कोणते, कोणत्या अभ्यासक्रमांना पुढे वाव आहे, परदेशातल्या संधी कशा मिळवाव्या, हे आणि अशाप्रकारचे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात असतात. करोनाकाळात तर हे प्रश्न अधिकच भेडसावू लागले आहेत. या प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून मिळाल्यास करिअरची निवड अधिक सोपी होते. म्हणूनच लोकसत्ताने ‘मार्ग यशाचा’ हा ऑनलाइन करिअर मार्गदर्शन उपक्रम आयोजित के ला आहे. २१, २२ आणि २३ जुलैला हा कार्यक्रम होणार आहे.

या वेळी विज्ञान, कला आणि वाणिज्य या तिन्ही शाखांमधील करिअर संधी, या शाखांमधून शोधता येणाऱ्या वेगळ्या शिक्षणवाटा, नव्याने उदयास आलेल्या संधी, परदेशातील शिक्षणाची सद्य:स्थिती, या सगळ्यांविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील, तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंकांचे निरसनही करतील. या ऑनलाइन सत्रात सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

सहभागी होण्यासाठी…

http://tiny.cc/LS_MargYashacha

या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ज्या सत्रांमध्ये सहभागी व्हायचे असेल, त्याप्रमाणे नोंदणी करा.

’नोंदणी करून झाल्यावर आमच्याकडून तुम्हाला ई-मेल आयडीवर संदेश येईल.

’याद्वारे २१ जुलैपासून वर नमूद केलेल्या वेळेत या वेब-संवादात सहभागी होता येईल.

’अधिक माहितीसाठी http://www. loksatta.com  या संकेतस्थळाला भेट द्या.

आज- कला शाखेतील संधी

मार्गदर्शक – समुपदेशक डॉ. श्रीराम गीत

२२ जुलै – वाणिज्य शाखेतील संधी

मार्गदर्शक  – बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचे (स्वायत्त महाविद्यालय) माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ

२३ जुलै – विज्ञान शाखेतील संधी

मार्गदर्शक – करिअर समुपदेशक विवेक वेलणकर

वेळ – संध्याकाळी ५ वाजता.

सहप्रायोजक – आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta career loksata marga yash guidance program akp

ताज्या बातम्या