जुलै महिना उजाडला तरी शाळा सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे अभ्यासाचे काय, शिक्षण पुढे कसे जाणार, हे प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना सतावत आहेत. शासनाने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय घोषित केला, मात्र त्यामुळे नवेच प्रश्न निर्माण झाले आहेत.

याबाबत सरकार आणि शाळांची नेमकी भूमिका आणि पालकांना काय वाटते, यावर चर्चा करणारा ‘ऑनलाइन शाळा, ऑफलाइन शिक्षण’ या विषयावरील परिसंवाद येत्या सोमवारी (६ जुलै) रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत वेबसंवादाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड या परिसंवादात सहभागी होणार आहेत.  ऑनलाइन शाळा सुरू झाल्यास प्रत्येकाच्या घरी इंटरनेट कसे पोहोचणार, या प्रश्नापासून घरून अभ्यास करणारी मुले खरोखरच गांभीर्याने तो करू शकतील का, नेमका अभ्यासक्रम काय असेल, वेळ काय असेल यांबरोबरच शिक्षकांचे प्रशिक्षण, गृहपाठ तपासणे, परीक्षा घेणे याविषयीही संदिग्धता आहे. ‘चतुरंग चर्चा’ मध्ये पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातल्या या साऱ्या प्रश्नांवर उत्तरे मिळतील.

भविष्यासाठी..

भविष्यातील शिक्षणाचे स्वरूप काय असेल याबाबत विद्यार्थी आणि पालकांच्या सर्व शंकांना उत्तरे मिळावीत यासाठी ‘चतुरंग चर्चा’च्या माध्यमातून हा वेबसंवाद आखण्यात आला आहे.  शिक्षणाच्या बदललेल्या माध्यमांमध्ये सध्या निर्माण होणाऱ्या अडचणी कशा टाळता येतील, यावरही चर्चा होईल.

सहभागी  होण्यासाठी.. https://tiny.cc/LS_ChaturangCharcha_6July  येथे नोंदणी आवश्यक