मुंबई: सामान्य स्त्रिया संकटांशी दोन हात करत आपले ध्येय कसे गाठतात आणि आपल्याबरोबर इतरांनाही कशा प्रगतिपथावर आणतात, याच्या नऊ असामान्य कहाण्या उलगडणारा ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’ सोहळा ‘एबीपी माझा’ वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या या समारंभात साजरा करण्यात आलेला ज्येष्ठ कवयित्री शान्ता शेळके  यांच्या कविता व गीतांचा शब्दोत्सव हेही या प्रक्षेपणाचे एक आकर्षण ठरेल.

येत्या शनिवारी (१३ नोव्हेंबर) दुपारी ४ वाजता ‘एबीपी माझा’ वाहिनीवर हा कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येणार आहे. तसेच याच दिवशी ‘लोकसत्ता’च्या चतुरंग पुरवणीत समारंभाचे विस्तृत वार्ताकनही वाचायला मिळणार आहे. मुंबईत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ येथे झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांमधून निवडलेल्या नऊ ‘दुर्गा’चा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने आणि ऊर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच याप्रसंगी ज्येष्ठ नृत्यांगना व नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांना ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले.

3000 Women in Akola, Read Constitution s Preamble, 75 thousand times, Amrit Jubilee Year, 75 year of indian constition, akola news, indian constitution news, indian constitution reading, 3000 Women reading constitution,
अकोला : तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधान प्रस्तावनेचे वाचन
Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
first case registered for violation of code of conduct in mira road
मिरा रोड येथे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित

याच समारंभात शान्ता शेळके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘जीवनगाणी’ संयोजित शब्दोत्सव सादर करण्यात आला. यात प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, मधुरा वेलणकर आणि अनुश्री फडणीस यांनी शान्ता शेळकेंच्या निवडक कवितांचे वाचन के ले, तर केतकी भावे, सोनाली कर्णिक आणि मंदार आपटे यांनी शान्ताबाईंच्या लोकप्रिय गीतांचे सादरीकरण के ले. कार्यक्रमाचे निवेदन अभिनेत्री हेमांगी कवी यांनी के ले. उत्तरोत्तर रंगत गेलेला हा कार्यक्रम शनिवारी रसिकांना दूरचित्रवाणीवर पाहता येईल.

पुरस्काराविषयी.. ‘लोकसत्ता दुर्गा’ उपक्रमाअंतर्गत दरवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या नऊ स्त्रियांचा गौरव केला जातो. या पुरस्कारांचे हे आठवे वर्ष आहे. बिकट परिस्थितीवर मात करून परित्यक्ता स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या अरुणा सबाने, प्लॅस्टिक कचऱ्यापासून इंधन बनवणाऱ्या डॉ. मेधा ताडपत्रीकर, रेशमाच्या किडय़ांपासून मिळणाऱ्या स्रावाचा मानवी उपचारांसाठी उपयोग करण्याबाबतचे संशोधन करणाऱ्या डॉ. अनुया निसळ, रत्नांची पारख करण्याच्या शास्त्रातील तज्ज्ञ डॉ. जयश्री पंजीकर, ओडिसी नृत्यातील ज्येष्ठ नृत्यांगना व वंचितांना नृत्यशिक्षण देणाऱ्या नृत्यगुरू झेलम परांजपे, लैंगिक अत्याचारपीडित व कचरावेचक व्यक्तींसाठी काम करणाऱ्या वृषाली मगदुम, गडचिरोलीत आदिवासी स्त्रियांचे संघटन उभारणाऱ्या शुभदा देशमुख, दृष्टिहीनतेवर मात करून जर्मन भाषेत ‘पीएच.डी.’ मिळवणाऱ्या डॉ. ऊर्वी जंगम, ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’च्या यंदा मानकरी ठरल्या आहेत.

मुख्य प्रायोजक :  ग्रॅव्हीटस फाऊंडेशन

सहप्रायोजक :  महाराष्ट्र औद्योगिक  विकास महामंडळ, 

* व्ही. पी. बेडेकर अ‍ॅँड सन्स प्रा. लि. 

*  सनटेक रिअल्टी लि.

*  बुलडाणा अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि.

पॉवर्ड बाय :

* प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे,

* राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.

 टेलिव्हिजन पार्टनर : * एबीपी माझा