मुंबई : गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेला स्त्रीशक्तीचा जागर यंदा, आठव्या वर्षीही त्याच उत्साहाने साजरा के ला जाणार असून त्यासाठी राज्यभरातून नामांकने येण्यास सुरुवात झाली आहे. ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’ साठी सामान्यांतील असामान्य स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती पाठविण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर असून त्यानंतर आलेल्या नामांकनांचा विचार के ला जाणार नसल्याने लवकरात लवकर ही नामांकने पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

यंदाही सामाजिक, वैद्यकीय, संशोधन, शैक्षणिक, कला-मनोरंजन, माहिती-तंत्रज्ञान, उद्योग, क्रीडा, पर्यावरण संरक्षण आदी क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या तसेच त्यात समाजाभिमुख दृष्टिकोन कायम ठेवणाऱ्या आणि इतर स्त्रियांनाही आपल्याबरोबर प्रगतीच्या वाटेवर घेऊन येण्यास प्रयत्नशील असलेल्या नऊ ‘दुर्गां’चा ‘लोकसत्ता’तर्फे  नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने गौरव केला जाणार आहे.

Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

अनेक स्त्रिया अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत जिद्दीने आपल्या क्षेत्रात उच्चपदी पोहोचतात किंवा विधायक योगदान देत असतात. काहीजणी आगळ्यावेगळ्या किं वा पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये लीलया आपला ठसा उमटवतात, काही सामाजिक कार्यात स्वत:ला झोकू न देत नवा आदर्श निर्माण करतात, तर काही विधायक उपक्रमांमधून समाजाची मानसिकता बदलवण्यासाठी प्रयत्न करतात. अशा प्रेरणादायी स्त्रियांचा विचार या पुरस्कारासाठी के ला जातो. त्यासाठी तुमची माहिती किंवा तुमच्या परिचयांच्या कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती आमच्यापर्यंत लवकर पोहोचवावी. यंदाच्या ‘लोकसत्ता दुर्गा- २०२१’मध्ये २० सप्टेंबरपर्यंत पाठवल्या जाणाऱ्या नामांकनांमधून तज्ज्ञ परीक्षकांतर्फे  नऊ स्त्रियांची पुरस्कारासाठी निवड के ली जाईल.

माहिती कुठे पाठवाल? माहिती loksattanavdurga@gmail.com  या ई-मेल आयडीवर वा टपालाने पुढील पत्त्यावर पाठवावी. ‘लोकसत्ता- महापे कार्यालय, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१०’. ई-मेलमध्ये आणि टपालाने पाठवल्या जाणाऱ्या पाकिटांवर ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’साठी असा ठळक उल्लेख करावा. पुरस्कारप्राप्त दुर्गांची माहिती ‘लोकसत्ता’ मध्ये थेट ७ ऑक्टोबरपासून प्रसिद्ध होईल. याविषयी कोणताही पत्रव्यवहार किं वा संपर्क  साधला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

पुरस्काराविषयी…  ही माहिती २० सप्टेंबर २०२१ पर्यंत ‘लोकसत्ता’कडे ५०० शब्दांत पाठवावी. माहितीबरोबर त्या कर्तृत्ववान स्त्रीचे छायाचित्र, पूर्ण पत्ता, संपर्क क्रमांक आणि ई-मेल आयडी पाठवणे आवश्यक. आलेल्या माहितीमधून परीक्षक समिती नऊ दुर्गांची निवड करेल आणि ती अंतिम असेल. नवरात्रीत नऊ दिवस दररोज यातील एका दुर्गेची ‘लोकसत्ता’तून ओळख करून दिली जाईल. त्यानंतर होणाऱ्या एका दिमाखदार सोहळ्यात नामवंतांच्या हस्ते नवदुर्गांचा सन्मान केला जाईल.

हे महत्त्वाचे… सामाजिक, वैद्यकीय, संशोधन, शैक्षणिक, कला-मनोरंजन, माहिती-तंत्रज्ञान, उद्योग, क्रीडा, पर्यावरण संरक्षण आदी क्षेत्रातील ‘दुर्गे’ची माहिती आपण पुरस्कारासाठी पाठवू शकता.ही माहिती २० सप्टेंबरपर्यंत पाचशे शब्दांत, मराठीतच आणि नोंदी स्वरूपात फक्त एकदाच पाठवावी. या स्त्रियांचे काम प्रेरणादायी, विधायक, समाजावर सकारात्मक परिणाम करणारे आणि त्या-त्या क्षेत्रात उच्च स्थानी पोहोचलेले असावे.

प्रायोजक

’मुख्य प्रायोजक : ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

’सहप्रायोजक : महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)