मुंबई : येत्या गुरुवारी शिवाजी पार्क  येथील स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारक येथे होणाऱ्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’ वितरण सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने आणि ऊर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते विविध क्षेत्रांमधून निवडलेल्या नऊ ‘दुर्गा’चा सन्मान के ला जाणार आहे. याच कार्यक्रमात ज्येष्ठ नृत्यांगना व नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांना यंदाच्या दुर्गाच्या हस्ते ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात येणार आहे.

येत्या २८ ऑक्टोबर रोजी (गुरुवार) सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिका शांता शेळके  यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या वेळी त्यांच्या कविता व गीतांचा शब्दोत्सवही साजरा के ला जाणार आहे. ‘करोना’संबंधीचे सर्व नियम पाळून होणाऱ्या या कार्यक्रमाच्या मोफत प्रवेशिका रसिकांसाठी प्रत्येक व्यक्तीस एक, याप्रमाणे कार्यक्रमस्थळी २६ ऑक्टोबरपासून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

Muralidhar Mohol, Mahayuti meeting,
पुणे : महायुतीची नदीपात्रात सभा, मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Modi, Karad, public meeting,
नरेंद्र मोदींची कराडमध्ये ३० एप्रिलला जाहीर सभा, उदयनराजेंच्या प्रचारार्थ आयोजन
Pune Airport s New Terminal still not open for public
अजित पवारांनी आधी सांगूनही पुणेकरांचे अखेर ‘एप्रिल फूल’! जाणून घ्या नेमके प्रकरण…
arvind kejriwal
मला तुरुंगात डांबणे हाच मोठा घोटाळा! केजरीवाल यांचा आक्रमक युक्तिवाद; कोठडीत चार दिवसांची वाढ

‘लोकसत्ता दुर्गा’ उपक्रमाअंतर्गत दरवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या नऊ स्त्रियांचा गौरव केला जातो. या पुरस्कारांचे हे आठवे वर्ष आहे. यंदा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत परित्यक्ता स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या अरुणा सबाने, प्लॅस्टिक कचऱ्यापासून इंधन बनवणाऱ्या डॉ. मेधा ताडपत्रीकर, रेशमाच्या किडय़ांपासून निघणाऱ्या स्रावाचा मानवी उपचारांसाठी उपयोग करण्याबाबतचे संशोधन करणाऱ्या डॉ. अनुया निसळ, रत्नांची पारख करण्याच्या शास्त्रातील तज्ज्ञ डॉ. जयश्री पंजीकर, ओडिसी नृत्यातील ज्येष्ठ नृत्यांगना व वंचितांना नृत्य शिक्षणात सामावून घेणाऱ्या नृत्यगुरू झेलम परांजपे, लैंगिक अत्याचारपीडित व कचरावेचकांसाठी काम करणाऱ्या वृषाली मगदूम, गडचिरोलीत आदिवासी स्त्रियांचे संघटन उभे करणाऱ्या शुभदा देशमुख, ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन, दृष्टिहीनतेवर मात करून जर्मन भाषेत ‘पीएच.डी.’ मिळवणाऱ्या डॉ. उर्वी जंगम, या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’च्या मानकरी ठरल्या आहेत.

मुख्य प्रायोजक :  ग्रॅव्हीटस् फाऊंडेशन

सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, व्ही.पी. बेडेकर अँड सन्स प्रा. लि., सनटेक रिअल्टी लि., बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बुलडाणा

पॉवर्ड बाय :  प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे, राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि.

 टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा