‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजनेत घरावर घर मोफत!

स्वत:च्या मालकीचे घर असावे, असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ ही योजना आणली आहे.

स्वत:च्या मालकीचे घर असावे, असे स्वप्न उराशी बाळगणाऱ्यांसाठी ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ ही योजना आणली आहे. शहरात घराचा शोध घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देताना ‘एका घरावर दुसरे नवेकोरे घर’ जिंकण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय वातानुकूलन यंत्रणा, फ्रीज अशा आकर्षक बक्षिसांसह परदेशी सहलही ग्राहकांना बक्षीस स्वरूपात मिळणार आहे. योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांनी बांधकाम व्यावसायिकांकडे ३१ ऑक्टोबपर्यंत घरखरेदी करताना मिळालेला अर्ज भरून जमा करायचा आहे.

वास्तुलाभ योजनेसाठी तुलसी इस्टेट हे टायटल पार्टनर, मोहन ग्रुप हे असोसिएट पार्टनर आणि केसरी हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. स्पर्धेच्या नियम व अटींसाठी लोकसत्ताच्या संकेतस्थळाला भेट द्या. आपल्याला हवे तसे मनासारखे घर प्रत्यक्षात मिळवताना अनेकांना महिनोन्महिने अनेक ठिकाणी फिरावे लागते. ग्राहकांचा हाच त्रास दूर करण्यासाठी आणि त्यांना एका घराच्या किमतीत दोन घर मिळावे यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल आदी परिसरात आटोपशीर घरांपासून आलिशान घरांपर्यंत सर्व प्रकारचे पर्याय या योजनेत उपलब्ध करण्यात आले आहेत. आजवरची ही सर्वात अनोखी अशी योजना असून ग्राहकांनी लाभ उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेत सहभागी झालेल्या बांधकाम व्यावसायिकांची नावे आणि दूरध्वनी क्रमांकाची माहितीसह आणि इतर माहिती ‘लोकसत्ता वास्तुरंग वास्तुलाभ’ योजनेमध्ये दिली जाणार आहे.

ग्राहकांना परदेशवारीची संधी
सोडतीतील भाग्यवंतांना खरेदी केलेल्या घरासोबतच आणखी एक नवेकोरे घर जिंकण्याची संधी मिळेलच; पण यासोबत परदेश सहल, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसेही मिळणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta event for win home