‘लोकसत्ता गणेश उत्सव मूर्ती स्पर्धे’चा पुरस्कार सोहळा

मुंबईचा राजा कोण ठरणार? याची शिगेला पोहोचलेली उत्सुकता ४ ऑक्टोबरला दूर होणार आहे. ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत ‘गणेश उत्सव मूर्ती स्पर्धा-२०१८’चे नामांकन जाहीर करण्यात आले आहे. पारितोषिके पटकावणाऱ्या विजेत्यांना प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमात रोख पारितोषिक, मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येईल. ‘जीवनगाणी’ निर्मित ‘गणराज रंगी नाचतो’ आणि विविध नृत्याविष्कार हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असेल. नामांकन मिळालेल्या आणि स्पर्धेत सहभाग घेतलेल्यांना या कार्यक्रमासाठी विनामूल्य प्रवेश मिळेल.

‘भारतीय आयुर्विमा महामंडळ’ आणि ‘रिजेन्सी ग्रुप’ या स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. स्पर्धेचे बँकिंग पार्टनर ‘अभ्युदय को.ऑप. बँक लिमिटेड’ आहेत. तर स्पर्धा बेडेकर अ‍ॅण्ड सन्स, मिलसेन्ट, चितळे घी, इंडियन ऑईल, पितांबरी यांच्यातर्फे ‘पॉवर्ड बॉय’ आहे. स्पर्धेचे रेडिओ पार्टनर ‘रेड एफएम ९३.५’ आहे.

‘मुंबईचा राजा’ पारितोषिक पटकावणाऱ्या मंडळाला रुपये ५१,००१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. रिजेन्सी ग्रुप पर्यावरणस्नेही मंडळाला १५००० रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. या शिवाय भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) पर्यावरणस्नेही मूर्तिकार (रुपये २५०० रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र), विभागवार पारितोषिके( रुपये १५,००१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र), सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शन (२,५०१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र), सवरेत्कृष्ट संहिता लेखन (२,५०१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र), सवरेत्कृष्ट मूर्तिकार (२,५०१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र) ही पारितोषिके देण्यात येणार आहेत.

कार्यक्रम कधी?

४ ऑक्टोबर, संध्याकाळी ६.३० वाजता

कुठे?

रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी