‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत यंदाच्या ‘लोकसत्ता मुंबई गणेश उत्सव मूर्ती स्पर्धे’त अंधेरीतील स्वप्नाक्षय मित्र मंडळ व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मॉडेल टाऊन ‘मुंबईचा राजा’ ठरले. ५१,००१ रोख, मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. निकाल जाहीर होताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल, ताशाच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात आपला आनंद व्यक्त केला.

पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ‘पर्यावरणस्नेही सजावट’ हे विशेष पारितोषिक देण्यात आले. रोख रक्कम १५,००० रुपये, मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरुप आहे. वाचक पसंती पुरस्कार भायखळ्यातील पंगेरी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रदान करण्यात आला.

Conservation Work, Kolhapur s Mahalakshmi Ambabai Idol, Original Idol Unavailable for Darshan, mahalakshmi ambabai darshan not 2 days, 14 to 15 april 2024, kolhapur mahalakshmi mandir, mahalakshmi ambabai,
रविवारपासून अंबाबाई देवीच्या मूर्तीचे संवर्धन; भाविकांना दर्शन पितळी उंबऱ्यापासून
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
Blood donation by AAP
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे रक्तदान

कुलाबा ते अंधेरी, जोगेश्वरी ते दहिसर, सीएसटी ते मुलुंड, ठाणे शहर, डोंबिवली-कल्याण आणि नवी मुंबई अशा सहा विभागात ही स्पर्धा घेण्यात आली. ‘एलआयसी’ आणि बेडेकर सहप्रायोजक आहेत तर पॉवर्डबाय ‘मिल्सेंट’ असून ‘डीएनएस’ बँक बॅकिंग पार्टनर आहेत याचबरोबर रेड एफएम ९३.५. रेडिओ पार्टनर आहेत. या वेळी जीवनगाणी निर्मित ‘गणराज रंगी नाचतो’ हा कार्यक्रम सादर झाला. नृत्याविष्कार आणि गाणी असे या कार्यक्रमाचे स्वरुप होते.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

  • विभागवार प्रथम पारितोषिके (पुरस्काराचे स्वरुप-रोख रक्कम १५,००१, मानचिन्ह आणि सन्मानपत्र)
  • कुलाबा-अंधेरी विभाग- अंधेरीतील स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव व मॉडेल टाऊन.
  • जोगेश्वरी ते दहिसर विभाग- नवशक्ती मित्र मंडळ, गोराई-२.
  • सीएसटी ते मुलुंड विभाग- रायगड चौक सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळ, घाटकोपर.
  • ठाणे शहर विभाग- पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळा, गणेशोत्सव मंडळ, ठाणे.
  • डोंबिवली-कल्याण विभाग- विजय तरुण मंडळ, कल्याण.
  • नवी मुंबई विभाग- शिवछाया मित्र मंडळ, तुर्भे

सवरेत्कृष्ट कला दिग्दर्शक

  • कुलाबा ते अंधेरी- धर्मेश शहा, आझादनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अंधेरी.
  • जोगेश्वरी ते दहिसर-नरेंद्र भगत, शिव मित्र मंडळ, बोरीवली.
  • सीएसटी ते मुलुंड- स्वप्नील सामंत, बाल मित्र मंडळ, विक्रोळी.
  • ठाणे शहर- सुंदर देवार, ओमशक्ती विनायक मित्र मंडळ, ठाणे.
  • डोंबिवली-कल्याण- मंगेश नारकर, अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोबिवली.
  • नवी मुंबई विभाग- प्रसन्न कारखानीस/ यशवंत पाटील, नवसाला पावणारा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, से. १७ वाशी.

सवरेत्कृष्ट मूर्तीकार

  • कुलाबा ते अंधेरी- सतीष गिरकर, श्रीगणेश क्रीडा मंडळ, अंधेरी.
  • जोगेश्वरी ते दहिसर- राजेंद्र वारणकर, विघ्नहर्ता रहिवासी मित्र मंडळ, बोरीवली.

सीएसटी ते मुलुंड- प्रभाकर मुळ्ये, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जंगलमंगल विभाग, भांडुप.

  • ठाणे शहर- राकेश घोष्टेकर, श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ.

डोंबिवली-कल्याण- जयदीप आपटे, दूधनाका गणेश प्रेमी मंडळ, कल्याण.

  • नवी मुंबई- दीपिका म्हात्रे, सीवूड्स रेसिडेंस वेल्फेअर असो. सीवूड्स.

सवरेत्कृष्ट संहिता लेखन

  • कुलाबा ते अंधेरी- अभिजीत गायकवाड, दी वरळी आंबेडकरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.
  • जोगेश्वरी ते दहिसर- अमोद सावंत, नवतरुण मित्र मंडळ, दहिसर.
  • सीएसटी ते मुलुंड- अरविंद कटके, इलेव्हन इविल्स क्रिकेट क्लब गणेशोत्सव मंडळ, धारावी. ठाणे शहर- महेंद्र विश्वकर्मा, हाजुरी उत्कर्ष मंडळ, ठाणे.
  • डोंबिवली-कल्याण- प्रज्ञा रोझेकर, राजाजी पथ गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली.
  • नवी मुंबई- नितीन पवार, नवयुग उत्सव मंडळ, नेरुळ यांना प्रदान करण्यात आला.

((      ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत यंदाच्या ‘लोकसत्ता मुंबई गणेश उत्सव मूर्ती स्पर्धे’त अंधेरीतील स्वप्नाक्षय मित्र मंडळ व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मॉडेल टाऊन ‘मुंबईचा राजा’ ठरले. यावेळी करंडकासह मंडळाचे कार्यकर्ते.

(छाया : प्रशांत नाडकर)      ))