scorecardresearch

‘पूर्णब्रह्म’चे गुरुवारी प्रकाशन

पाच शेफ खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणार

‘पूर्णब्रह्म’चे गुरुवारी प्रकाशन

पाच शेफ खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणार

नानाविध चविष्ट आणि पौष्टिक पाककृती असणाऱ्या यंदाच्या ‘पूर्णब्रह्म’ अंकाचे प्रकाशन गुरुवारी, २३ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे. कोकणी, पश्चिम महाराष्ट्रीय, खान्देशी, मराठवाडी आणि वैदर्भीय खाद्यसंस्कृतीची ओळख करून देण्यात येणार आहे.

‘महाराष्ट्र तुमच्या ताटात’ देणाऱ्या यंदाच्या ‘पूर्णब्रह्म’ मधून महाराष्ट्राच्या रुचिसंपन्न खाद्यसंस्कृतीची ओळख करून देत आहेत आमचे खास पाच शेफ मोहसिना मुकादम (कोकण), मंजिरी कपडेकर (पश्चिम महाराष्ट्र), आशालता पाटील (खान्देश), सायली राजाध्यक्ष (मराठवाडा) आणि विष्णू मनोहर (विदर्भ).

खाद्यसंस्कृतीबरोबरच त्या त्या प्रांतातील चवदार, चटकदार, चमचमीत पाककृती तेवढय़ाच आकर्षित छायाचित्रांसह या अंकात वाचायला मिळणार आहेत. प्रत्येकाने संग्रही ठेवावा, असे वाटणाऱ्या या अंकाचा प्रकाशन सोहळाही तितकाच रंगतदार होणार असून या कार्यक्रमात हे पाचही शेफ उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात ते करून दाखवणार आहेत, त्या त्या प्रांतातील विस्मरणात गेलेले पदार्थ आणि या खाद्यसंस्कृतीविषयी प्रेक्षकांना त्यांच्याशी गप्पाही मारता येणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून, उपस्थितांना विविध प्रांतातील नानाविध खाद्यसंस्कृतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची संधी या कार्यक्रमाद्वारे मिळणार आहे.

Untitled-1

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-06-2016 at 01:14 IST
ताज्या बातम्या