नवरात्रीला सामाजिक जोड देणारा लोकसत्ताचा उपक्रम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सणांना सामाजिक जाणिवेची जोड देण्याची मोहीम गेल्या काही वर्षांपासून ‘लोकसत्ता’ राबवित आहे. ज्ञान, कलाजाणिवा आणि समाज-सामथ्र्य जागविणाऱ्या दहा सामाजिक संस्थांना गणेशोत्सवाच्या दिवसांत ‘लोकसत्ता’द्वारे जनाधार लाभतो. त्याचप्रमाणे नवरात्रीत ‘शोध नवदुर्गेचा’ हा उपक्रम समाजातील स्त्रीशक्ती जागवितो. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष असून या निमित्ताने आपल्या अवतीभवतीच्या ‘दुर्गा’चा शोध घेण्याची संधी जनसामान्यांना मिळत आहे.

समाजात अनेक विधायक कार्ये घडविण्यात स्त्रियांचाच अनेकदा पुढाकार असतो. अनेकदा अशा स्त्रिया प्रसिद्धी आणि नावलौकिकापासून दूर राहूनदेखील हे काम अविरत करीत असतात. अशा नऊ कर्तृत्ववान स्त्रियांच्या कामगिरीला सलाम करणारा हा स्त्रीशक्तीचा जागर येत्या नवरात्रीत घडविण्यात येणार आहे.

क्षेत्र कोणतेही असो सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, तंत्रज्ञान, विज्ञान, लष्करी, आदिवासी.. या आणि अशा अनेक क्षेत्रांत उच्च ध्येय समोर ठेवून विधायक कार्य करणाऱ्या तुमच्या आमच्यातल्याच स्त्रीशक्तीला समाजापुढे आणण्याचा आणि तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा या उपक्रमाचा हेतू आहे.  त्यातूनच या उपक्रमासाठी असामान्य कर्तृत्व केलेल्या नऊ  ‘दुर्गा’ची निवड करण्यात येणार आहे.  ‘शोध नवदुर्गेचा’ या उपक्रमासाठी, एकावेळी एकाच कर्तृत्ववान स्त्रीची माहिती ३०० शब्दांत पाठवायची आहे. माहितीमध्ये त्यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेऊन मुख्य कामे अधोरेखित करावीत. त्यांना पुरस्कार मिळाले असल्यास त्यांचा स्पष्ट उल्लेख करावा. या ‘दुर्गे’चे संपूर्ण नाव, पत्ता, इमेल आयडी (असल्यास), छायाचित्र, मोबाइल क्रमांकही पाठवावा. तसेच ही माहिती पाठवणाऱ्यांनी आपलाही इमेल आयडी व दूरध्वनी क्रमांक माहितीसोबत द्यावा. ही व्यक्ती वादग्रस्त नसावी आणि पाठवलेली माहिती सत्य असावी.

आमचा पत्ता: लोकसत्ता ‘शोध नवदुर्गे’चा, ईएल १३८, टी टी सी इंडस्ट्रियल इस्टेट, महापे, नवी मुंबई ४००७१० किंवा खालील ई-मेल वर मेल करा.

loksattanavdurga @gmail.com

  • माहिती ईमेलद्वारे अथवा कुरिअर वा टपालाने आमच्या कार्यालयीन पत्त्यावर २० सप्टेंबपर्यंत पोहोचणे आवश्यक
  • नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या उपक्रमामधून फक्त नऊ ‘दुर्गा’चीच निवड करण्यात येणार असल्याने अंतिम निर्णय परीक्षकांचा असेल, तसेच यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार, दूरध्वनी संवाद केला जाणार नाही. पत्रावर ‘ शोध नवदुर्गेचा’ आवर्जून लिहावे.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta navdurga
First published on: 12-09-2016 at 00:37 IST