‘कलर्स मराठी’वर आजपासून मराठमोळ्या पदार्थाची पंगत!

महाराष्ट्राच्या विविध भागांतील एकेक खाद्यपदार्थाची नुसती नावे घेतली तरी तोंडाला पाणी सुटते.

‘मेजवानी परिपूर्ण किचन’मध्ये ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ विशेष

महाराष्ट्राच्या विविध भागांतील एकेक खाद्यपदार्थाची नुसती नावे घेतली तरी तोंडाला पाणी सुटते. हे खाद्यपदार्थ केवळ चमचमीत, चविष्ट नव्हे तर तितकेच सकस व पोषणमूल्य असणारे आहेत. महाराष्ट्राची ही संपन्न खाद्यसंस्कृती आजपासून (४ जुलै) ‘कलर्स मराठी’वरील ‘मेजवानी परिपूर्ण किचन’ कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. पाच नामवंत शेफ महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील चविष्ट व आरोग्यपूर्ण खाद्यपदार्थाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून देणार आहेत.

‘मेजवानी परिपूर्ण किचन’ कार्यक्रमात मोहसिना मुकादम (कोकण), मंजिरी कपडेकर (पश्चिम महाराष्ट्र), आशालता पाटील (खान्देश), सायली राजाध्यक्ष (मराठवाडा), विष्णू मनोहर (विदर्भ) हे नामवंत शेफ सहभागी होणार आहेत. या शेफकडून विविध खाद्यपदार्थाची प्रात्यक्षिके दाखविली जाणार असून, ती खवय्यांसाठी मेजवानीच ठरणार आहे.

‘विम’ प्रस्तुत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चे ‘एलजी’ हे सहप्रायोजक असून टेस्ट पार्टनर ‘रामबंधू’ आहेत. पॉवर्ड बाय ‘केसरी’, ‘आयुशक्ती’ असून ‘कलर्स मराठी’ हे टेलिव्हिजन पार्टनर आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘मेजवानी परिपूर्ण’ किचन कार्यक्रमात सोमवारपासून (४ जुलै) सुरू होणारी ही खाद्ययात्रा शनिवार ९ जुलैपर्यंत चालणार आहे. दररोज दुपारी दीड वाजता खवय्यांना मेजवानी मिळणार आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta purnabramha in mejwani paripoorna kitchen

ताज्या बातम्या