‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’ला आजपासून सुरुवात

मुंबई : दिवाळी आणि सोने खरेदी यांचे नाते अतूट आहे. गेल्या वर्षी करोना संसर्गामुळे दिवाळी साधेपणाने साजरी झाली. तणावाचे ते दिवस बाजूला ठेवून या वर्षी आनंदाने दिवाळी साजरी करताना पहिला मान अर्थातच सोने खरेदीचा असणार आहे. अगदी एक ग्रॅम सोन्यापासून ते सोन्याच्या आकर्षक दागिन्यांच्या खरेदीवर बक्षिसांची लयलूट करण्याची संधी ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’च्या माध्यमातून ग्राहकांना मिळणार आहे.

खरेदीचा हा सुवर्णयोग २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) सहप्रायोजित ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’मुळे जुळून आला आहे. सोन्याची खरेदी म्हणजे केवळ स्त्रियांचे दागिने ही समजूतही आता मागे पडली असून पुरुषांसाठीही सोन्याच्या दागिन्यांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. स्वत:साठी किंवा आपल्या जिवलगांसाठीही भेटवस्तू म्हणून सोन्याची खरेदी केली जाऊ लागली आहे. या दिवाळीत सोने खरेदीचा हा आनंद बक्षिसांच्या रूपाने द्विगुणित करण्याची संधी ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’मुळे मिळाली आहे.

सहभाग कसा घ्याल?

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’त २७ ऑक्टोबरपासून सहभागी असलेल्या सराफांकडून ग्राहकांनी उपरोक्त कालावधीत तीन हजार रुपये वा त्यापेक्षा अधिक किमतीचे सोने वा सोन्याचे दागिने खरेदी करायचे आहेत. खरेदी केलेल्या या दागिन्यांवर ग्राहकांना एका बिलावर एक प्रवेशिका दिली जाईल. ही प्रवेशिका पूर्ण भरून तेथील ड्रॉप बॉक्समध्ये टाका आणि एलईडी टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन अशी आकर्षक बक्षिसे जिंका. सुवर्ण खरेदीवर बक्षिसे जिंकण्याची ही संधी हातची जाऊ नये यासाठी घाई करा  आणि आपापल्या परिसरातील ‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’त सहभागी असलेल्या सराफांच्या दुकानांना भेट द्या. या योजनेच्या शेवटच्या दिवशी सर्व दुकानांमधून प्रवेशिका जमा केल्या जाणार आहेत. या सर्व प्रवेशिका एकत्र करून सोडत पद्धतीने विजेत्यांची निवड केली जाईल. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता’मधून जाहीर केली जातील. या स्पर्धेसाठी नियम व अटी लागू आहेत.

प्रायोजक

‘लोकसत्ता सुवर्णलाभ योजने’चे प्लॅटिनम पार्टनर लागू बंधू आणि एम. के. घारे ज्वेलर्स. गोल्ड पार्टनर- श्री नेमिनाथ ज्वेलर्स आणि सी. ए. पेंडुरकर अ‍ॅण्ड कंपनी. सिल्व्हर पार्टनर वाकडकर ज्वेलर्स आणि चिंतामणीज् ज्वेलर्स हे आहेत. तसेच आय केअर पार्टनर श्री रामकृष्ण नेत्रालय आहेत.