राज्यात दीड वर्षांतील सर्वात कमी रुग्णसंख्या

दर रविवारी चाचण्यांचे प्रमाण कमी असते. गेल्या २४ तासांत एक लाखापेक्षा कमी नमुने तपासण्यात आले.

corona-patient
प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबई : चाचण्यांची संख्या  रविवारी कमी असल्यानेच रुग्णसंख्याही कमी होती. दिवसभरात ८०९ नव्या रुग्णांचे निदान झाले असून, मे २०२० नंतर दिवसभरातील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.

दर रविवारी चाचण्यांचे प्रमाण कमी असते. गेल्या २४ तासांत एक लाखापेक्षा कमी नमुने तपासण्यात आले. परिणामी रुग्णसंख्याही कमी होती. गेल्या सोमवारी राज्यात ८८९ रुग्ण आढळले होते. यापेक्षाही या सोमवारी कमी रुग्ण आढळले. दिवसभरात नगर जिल्हा ८२, पुणे जिल्हा ६०, पुणे शहर ५०, पिंपरी-चिंचवड २९ नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या १५,५५२ रुग्ण उपचाराधीन आहेत. सर्वाधिक ४५०३ रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. ठाणे जिल्हा १६१८, पुणे जिल्हा ३२१० रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत नव्या रुग्णांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

सोमवारी मुंबईत नव्याने आढळून आलेल्या करोना रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक होती. सोमवारी २६७ नवे रुग्ण आढळले, तर ४२० रुग्ण करोनामुक्त झाले. चार रुग्णांचा मृत्यू झाला.

एकूण रुग्णसंख्या सात लाख ५६ हजार २१४ झाली आहे. तर करोनामुक्त झालेल्यांची संख्या सात लाख ३३ हजार ७३८ झाली आहे. सध्या मुंबईत तीन हजार ६८९ उपचाराधीन रुग्ण आहेत.

रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के आहे.  रुग्ण दुपटीचा कालावधी एक हजार ५९५ दिवसांवर पोहोचला आहे.

सोमवारी मुंबईत ३२ हजार २२१ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण एक कोटी १४ लाख ८५ हजार ३५२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ३३ इमारती प्रतिबंधित आहेत.

ठाणे जिल्ह्यात ११८ करोना रुग्ण

ठाणे जिल्ह्यात सोमवारी ११८ करोना रुग्ण आढळून आले. तर दोन जणांचा मृत्यू झाला.  जिल्ह्यातील ११८ करोना रुग्णांपैकी ठाणे ४९, नवी मुंबई २३, कल्याण- डोंबिवली १७, मिरा भाईंदर १३, ठाणे ग्रामीण सात, बदलापूर चार, उल्हासनगर तीन, अंबरनाथ एक आणि भिवंडीत एक करोना रुग्ण आढळून आला. दोन मृतांपैकी ठाणे एक आणि उल्हासनगरमधील एकाचा सामावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lowest number of patients in the state in one and a half years akp

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या