मुंबई : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) – धनबाद विशेष रेल्वेगाड्यांच्या दोन सेवांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गाडी क्रमांक ०३३८० लोकमान्य टिळक टर्मिनस – धनबाद साप्ताहिक विशेष गाडी २६ मार्चपर्यंत दर गुरुवारी चालविण्यात येईल, असे सूचित करण्यात आले होते. तिचा कालावधी आता २ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर, गाडी क्रमांक ०३३७९ धनबाद – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडी, यापूर्वी दर मंगळवार, २४ मार्चपर्यंत चालविण्यात येईल, असे सूचित करण्यात आले होते. तिचा कालावधी आता ३१ मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे दोन सेवांमध्ये वाढ केली आहे.

दोन वातानुकूलित द्वितीय, २ वातानुकूलित तृतीय, ६ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ६ शयनयान श्रेणी, ४ सामान्य द्वितीय, १ द्वितीय आसन श्रेणी-सह गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर डबा अशी संरचना असेल. या विशेष रेल्वेगाडीच्या विस्तारित फेऱ्यांसाठीचे आरक्षण २९ मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. आरक्षणरहित डब्यांसाठीचे आरक्षण ‘यूटीएस’ प्रणालीद्वारे करता येईल. यासाठी अतिजलद मेल/एक्स्प्रेस गाड्यांना लागू होणारे आरक्षणरहित प्रवासाचे नेहमीचे शुल्क आकारले जाईल.