माधव भंडारी यांचे आरोप बिनबुडाचे

काही राजकीय कारणांमुळे राज्यात वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याचा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेला आरोप दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने स्पष्ट केले आहे.

काही राजकीय कारणांमुळे राज्यात वीजपुरवठा खंडीत केला जात असल्याचा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेला आरोप दिशाभूल करणारा असल्याचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने स्पष्ट केले आहे. मुदतीत देयक रक्कम न भरल्यास विद्युत अधिनियमानुसार वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई नियमितपणे केली जाते. यामुळे जे ग्राहक रक्कम वळेत भरणार नाहीत त्यांच्यावर कारवाई ही होणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले. मते दिली नाही, यासाठी अनेक भागांमध्ये सरकारकडून वीज व पाणीपुरवठा तोडला जात असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सूडाचे राजकारण करत असल्याचे आरोप भंडारी यांनी केले होता. याबाबत महावितरणने हा खुलासा केला
आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Madhav bhandari allegation baseless mahavitaran