मुंबई : मराठी प्रकाशनविश्वातील अग्रणी म्हणून नावलौकिक असलेल्या मौज प्रकाशनगृहाचे संचालक माधवराव भागवत यांचे शनिवारी पहाटे दीड वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी शीव येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी ललिता भागवत, दोन मुले आणि त्यांचा परिवार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रकाशन व्यवसायात दर्जेदार साहित्यनिर्मिती करत आपले स्थान टिकवून ठेवणाऱ्या मौज प्रकाशनाचा वारसा पांडुरंग भागवत, दत्तात्रेय भागवत, विष्णुपंत भागवत, श्री. पु. भागवत यांच्यासारख्या विलक्षण प्रभावी संपादकांनंतर माधवराव भागवतांनी यशस्वीपणे सांभाळला. ते प्रामुख्याने मुद्रणतज्ज्ञ होते. मुळातच भागवत कुटुंबीयांचा साहित्य आणि प्रकाशन व्यवसायातील लौकिक मोठा असल्याने माधवरावांचाही साहित्यवर्तुळातील वावर कायम राहिला. प्रयोगशील, सर्जनशील नवे लेखक शोधून त्यांचे साहित्य मौज प्रकाशनाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याची परंपरा त्यांनी कायम ठेवली. उत्कृष्ट संपादन ही ‘मौज’ची खासियतही त्यांनी जपली. मराठी पाठय़पुस्तक प्रकाशन वर्तुळातही त्यांचा वावर होता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhavrao bhagwat publishing house passed away marathi publishing world ysh
First published on: 17-07-2022 at 00:58 IST