मुंबई : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या पुढाकाराने सीएसआरच्या मदतीने राज्यात दोन मधुबन हनी पार्क उभारण्यात येत आहेत. पहिल्या हनी पार्कचे महाबळेश्वर येथील मध संचालनालयात मंगळवारी (४ फेब्रुवारी) उद्घाटन होत आहे, तर दुसरे मुंबईतील राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली येथे होणार आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाने सीएसआर निधी उभारून मध उत्पादनाला चालना देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. एव्हरेस्ट मसाले यांनी दिलेल्या सहा लाखांच्या सीएसआर निधीमधून महाबळेश्वर येथील मध संचालनालयाच्या आवारातील तीन एकर जागेत मधुबन हा हनी पार्क उभारला आहे. या पार्कमध्ये ३० मधपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. मधपेट्यांसह मध संकलन यंत्र, मध प्रक्रिया, स्वार्मनेट, राणी माशी पैदास उपकरण, पोलन ट्रॅप, ॲटी वेल एंड फिंडिंग, बी व्हेल आदी उपकरणे ठेवण्यात येणार आहेत. मधमाश्यांचा अभ्यास करण्यासाठी येणारे शेतकरी, मधपाळ, शालेय सहलींमधून येणारे विद्यार्थी आणि पर्यटक आदींना एकाच ठिकाणी मध उत्पादनाची सर्व माहिती प्रात्यक्षिकांसह मिळणार आहे. महाबळेश्वर येथील मध संचालनालय एक्सलन्स सेंटर व्हावे, असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहे.

Government positive about Turmeric Research Sub-Center in Sangli says Uday Samant
सांगलीत हळद संशोधन उपकेंद्रासाठी शासन सकारात्मक – उदय सामंत
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
mumbai municipal corporation has got three new assistant commissioners
मुंबई महानगरपालिकेला तीन नवे साहाय्यक आयुक्त
Sewri-Worli elevated road work will be speed up
शिवडी-वरळी उन्नत मार्गाचे काम घेणार वेग
Development permits under MMRDA now online
एमएमआरडीएच्या अखत्यारीतील विकास परवानग्या आता ऑनलाईन
केंद्राशी समन्वय साधण्याचा प्रयत्न; कांजूरमार्ग कारशेड मालकीप्रकरणी राज्य सरकारचा न्यायालयात दावा
Dr Pallavi Guha stated social media plays crucial role in integrating third parties into society
तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजमाध्यमे महत्त्वाची, सोलापूरच्या विद्यापीठात तृतीयपंथीयांची परिषद
pune district transport marathi news
पुणे : जिल्ह्याच्या एकात्मिक वाहतुकीसाठी तीस वर्षांचा आराखडा, १.२६ लाख कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दुसरे मधुबन हनी पार्क उभारण्यात येणार आहे. मधुबन हनी पार्कसाठी जागानिश्चिती सुरू आहे. उद्यानात पर्यटक, सहली मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे संबंधितांना एकाच ठिकाणी मध उत्पादनाची माहिती मिळणार आहे. उद्यानात माकडांची संख्या जास्त आहे. शिवाय पावसाळ्यातील संभाव्य समस्या आणि फुले अथवा मकरंदाची उपलब्धता पाहून स्थळनिश्चिती केली जात आहे. महाबळेश्वर येथे कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. उद्यानात कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे रोजगाराची गरज असलेल्या आदिवासी महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांची नेमणूक केली जाणार आहे.

महाबळेश्वर येथे देशात एकमेव स्वतंत्र मध संचालनालय आहे. या संचालनालयास सेंटर ऑफ एक्सलन्स करण्याचे नियोजन आहे. त्या दिशेने मधुबन हनी पार्क हे पहिले पाऊल आहे. खासगी कंपन्यांच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून मध उत्पादनाला गती दिली जात आहे. – रवींद्र साठे, सभापती, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ

Story img Loader