मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकमेकांशी समन्वय साधत काम करत आहेत. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबाला केंद्रीय तपास यंत्रणांकडून त्रास दिला जात असल्याने त्यांनी पत्र लिहिले. सत्ता गेल्याने अस्वस्थ असलेल्यांनी महाविकास आघाडीत फू ट पाडण्याचा प्रयत्न के ला तरी यश मिळणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय यंत्रणांचा त्रास व त्यापासून वाचण्यासाठी काही मंडळींनी के लेली पडद्याआडची हातमिळवणी यावर भाष्य करत पुन्हा भाजपशी जुळवून घेण्याची विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना के ली होती. त्या पत्रावरून राजकीय तर्क वितर्क  सुरू झाले. शिवसेनेत महाविकास आघाडी सरकार की युती सरकार यावरून गट पडल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू झाली. त्याबाबत बोलताना आमच्या पक्षात कोणतेही गट नाहीत.

शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट आहे. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत आणि सर्वजण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट के ले. तसेच संपूर्ण शिवसेना सरनाईक कु टुंबाच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी नमूद के ले.

सत्ता गेल्याने ज्यांच्या पोटात दुखत आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्षे चालणार. महाविकास आघाडीत फू ट पडणार नाही, असे राऊत म्हणाले.