मुंबई : महिलांना महिना ३००० रुपये, ५०० रुपयांमध्ये वर्षाला सहा सिलिंडर, मासिक पाळीच्या काळात दोन दिवसांची ऐच्छिक रजा, सर्व नागरिकांना १०० युनिट मोफत वीज, २.५ लाख सरकारी रिक्त पदे भरणे तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदा अशी विविध आश्वासने असणारा महाविकास आघाडीचा ‘महाराष्ट्रनामा’ रविवारी प्रकाशित करण्यात आला.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत काय कामे करणार व पाच वर्षांत काय कामे करणार याचे आश्वासन जाहीरनाम्यातून देण्यात आले आहे. ही निवडणूक फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशाचे भविष्य बदलणारी आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकरी, तरुण, महिलांसाठी हे सरकार घालवणे गरजेचे आहे. भाजप युतीचे खोके सरकार सत्तेतून खाली खेचून महाविकास आघाडीचे आणा असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केले. जाहीरनामा प्रकाशन समारंभाला खरगे यांच्यासह शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाळ, रमेश चेन्नीथला, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा >>> मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

१०० दिवसांत काय करणार ?

– महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना प्रतिमहा ३ हजार, मोफत बस प्रवास

– स्वयंपाकाचे ५०० रुपयांमध्ये सहा गॅस सिलिंडर

– निर्भय महाराष्ट्र धोरण आखून महिलांना स्वसंरक्षणाचे धडे, शक्ती कायद्याची अंमलबजावणी

– महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीसाठी दोन दिवस ऐच्छिक रजा

– जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावे बँकेत ठरावीक रक्कम, १८ वर्षांनंतर एक लाख रुपये

– शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी, कर्जफेडीस ५० हजार सूट

– शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती

– तरुण पदवी-पदविकाधारक बेरोजगारांना दरमहा ४००० रुपये भत्ता

– युवकांच्या कल्याणासाठी ‘युवा आयोग’

– सरकारी रुग्णालयांत मोफत औषधे

– नवे औद्योगिक धोरण आखणार, महिला उद्याोजकतेला प्रोत्साहन देणार

– सूक्ष्म व लघु उद्याोगांसाठी स्वतंत्र मंत्रालय

– महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना करणार

– संजय गांधी निराधार योजनेच्या लाभाची रक्कम दीडवरून दोन हजार रु.

– दरमहा तीनशे युनिटपर्यंत वापर असणाऱ्या ग्राहकांना शंभर युनिटपर्यंतचे वीज बिल माफ

– सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

– वृद्ध कलावंताच्या मानधन वाढ

– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार,

– निवडणुका एकदस्यीय प्रभाग पद्धतीने

– शहरीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी आणि त्याला योग्य दिशा देण्यासाठी ‘राज्य नागरी आयोग’

– इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम वेळेत करण्यासाठी आराखडा

– महायुतीने काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार

– खासगी संस्था व व्यक्तींना भूखंड देण्याबाबत काढलेल्या आदेशांचा फेरविचार करणार

– जगभरातील मराठी आणि महाराष्ट्रातील परभाषिकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यासक्रम

मिशन २०३०

– महिलांना स्वयंरोजगारासाठी ५ लाखांपर्यंत अत्यल्प व्याजदराने कर्ज

– शक्ती कायद्याची कठोर अंमलबजावणी

– आरोग्य, शेतकऱ्यांचे संरक्षण आणि हवामान बदलाचे संकट पेलण्यासाठी ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’

– कांदा आणि टोमॅटोला संरक्षण देत राज्यात गुलाबी आणि शेंदरी क्रांती

– पाच वर्षांत साडेबारा लाख बेरोजगारांना रोजगार

– अभिनव स्टार्टअप्ससाठी १ कोटीचा निधी

– इतर मागासवर्ग, अनुसूचित जातीजमातींतील उद्याोजकांना १ कोटी रुपयांचे अनुदान

– ‘गिग’ कामगारांना कायद्याचे संरक्षण

– महाराष्ट्रासाठी नवे शैक्षणिक धोरण

– मोदी सरकारच्या श्रम संहिता नाकारणार

– आनंदी शहरे विकसित करणार, मैदाने, उद्याने, मोकळ्या जागांचा विकास

– ‘नेट झीरो’ धोरण साकारण्याच्या दृष्टीने सस्टेनेबिलिटी सेलची स्थापना

– शहरांनजीक मोठ्या गावांत झोपडपट्टी पुनर्विकास योजना

– खाद्यातेल, तूर डाळ केशरी कार्डधारकांना रेशनवर

– सीमाप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर विकसित करणार

– खासगी कंपन्यांच्या वीजदरांवर अंकुश ठेवण्यासाठी मीटरचे लेखापरीक्षण

– कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण

Story img Loader