मुंबई : सध्या मुंबईतील अनेक इमारतींमध्ये स्वयंपाकासाठी पाईप गॅसचा (पीएनजी) वापर करण्यात येत आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून पाईप गॅसची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पीएनजी मीटर रीडिंग पाठवण्याचा एक सोपा पर्याय महानगर गॅस लिमिटेडकडून ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आता घरगुती ग्राहकांना पीएनजी मीटर रीडिंगचे छायाचित्र व्हॉट्सॲपवरून पाठवता येणार आहे. घरगुती ग्राहक आता महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकृत व्हॉट्सॲप खात्यावरून आलेल्या संदेशाला उत्तर देताना मीटर रीडिंग (८ आकडी) आणि मीटर क्रमांक दिसत असणाऱ्या पीएनजी मीटर रीडिंगचे छायाचित्र पाठवू शकतात. यामुळे देयकाची प्रक्रिया अधिक जलद व सोपी होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ग्राहकांनी मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी त्यांच्या बीपी / सीए क्रमांकावर नोंदवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी (०२२) ६८६७४५०० / (०२२) ६१५६४५०० या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच व्हॉट्सॲपवरून पीएनजी मीटर रीडिंग पाठविण्यासाठी कोणतेही तपशील देण्यापूर्वी ग्राहकांनी महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकृत व्हॉट्सॲप खात्यावर निळी टिक असल्याची पडताळणी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी www.mahanagargas.com या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्हॉट्सॲपसह विविध डिजिटल आणि इतर माध्यमांतून मीटर रीडिंग पाठविण्याचे पर्याय

  • एमजीएल कनेक्ट ॲपवर मीटरचा फोटो अपलोड करा
  • ९२२३५५५५५७ या क्रमांकावर
  • मीटरचे छायाचित्र आणि रीडिंगसह support@mahanagargas.com येथे ई-मेल पाठवा
  • वेबसाईट – www.mahanagargas.com येथे लॉगिन करून मीटर रीडिंग टाका
  • ग्राहकसेवा – (०२२) ६८६७४५०० / (०२२) ६१५६४५०० येथे कॉल करा