(

निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी एमएमआरडीएचा निर्णय

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहचणे आणि रात्री उशिरा घरी परतणे सोयीचे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांच्या सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या दोन्ही मार्गिकावरील सेवा बुधवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ५.५५ ऐवजी पहाटे ४ वाजता सुरू होईल. तसेच मेट्रो सेवा रात्री ११.३३ ऐवजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू राहील.

Delhi assembly elections 2025 news in marathi
दिल्ली’साठी आज मतदान; तिरंगी सामन्यात मतटक्क्यावर सत्तेचे गणित
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन (फोटो सौजन्य पीटीआय)
Political News : राजधानी दिल्लीत कुणाची सत्ता येणार? आकडेवारीने वाढवलं केजरीवालांचं टेन्शन
Court issues notice to Central Election Commission and State Chief Electoral Officers regarding Assembly elections Mumbai news
विधानसभा निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान; शेवटच्या मिनिटांसह अधिकृत वेळेनंतर झालेल्या भरघोस मतदानाबाबत शंका
Why were local elections delayed in the state
राज्यात स्थानिक निवडणुका लांबणीवर का पडल्या? तिसरी बाजी कोणाची? 
Hearing on municipal elections in Supreme Court on February 25
निवडणुका पावसाळ्यानंतर? पालिकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आता २५ फेब्रुवारीला सुनावणी
Delhi Assembly Election 2025 AAP Manifesto
Delhi Assembly Election 2025 : ‘आप’चा जाहीरनामा प्रसिद्ध; दिल्लीकरांसाठी अरविंद केजरीवालांच्या १५ मोठ्या घोषणा
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका

मुंबई महानगरपालिकेसह अन्य सरकारी यंत्रणांमधील कर्मचारी – अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने मतदानाच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी नियुक्त अधिकारी – कर्मचाऱ्यांना पहाटे लवकर मतदान केंद्रावर पोहचावे लागणार आहे. तसेच त्यांना निवडणुकीचे काम संपवून घरी परतण्यासाठी रात्री उशीर होणार आहे. त्यामुळे कर्मचारी – अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी ‘मेट्रो १’, ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या सेवा कालावधीत वाढ करण्याची विनंती मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) आणि एमएमआरडीएला केली होती. त्यानुसार एमएमओपीलएने याआधीच ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेच्या सेवा कालावधीत वाढ केली आहे. एमएमओपीएलच्या निर्णयानुसार बुधवारी ‘मेट्रो १’ची सेवा पहाटे ४ ते मध्यरात्री १ दरम्यान सुरू राहणार आहे. ‘मेट्रो १’पाठोपाठ आता एमएमआरडीएनेही ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा >>> डबेवाल्यांच्या व्यवसायाला घरघर; मुंबई डबेवाला असोसिएशनची शासन दरबारी याचना

मतदानाच्या दिवशी निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी – अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या सेवा कालावधीत बुधवार, २० नोव्हेंबर रोजी वाढ केली आहे. त्यानुसार पहिली मेट्रो बुधवारी सकाळी ५.५५ ऐवजी पहाटे ४ वाजता, तर शेवटची मेट्रो रात्री ११.३३ ऐवजी मध्यरात्री १ वाजता सुटेल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले. एमएमआरडीएच्या या निर्णयामुळे निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई विद्यापीठाचे पुनर्परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर

भुयारी मेट्रो पहाटे ४ ते मध्यरात्री १ दरम्यान धावणार

‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी टप्पा ७ ऑक्टोबरपासून वाहतूक सेवेत दाखल झाला असून या भुयारी मेट्रोमुळे आरे, सीप्झ, मरोळ, सहार, विमानतळ, बीकेसी, सांताक्रुझ, कलिना येथे पोहचणे सोपे झाले आहे. मतदानाच्या दिवशी या ठिकाणच्या मतदान केंद्रावर कार्यरत असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशननेही (एमएमआरसी) आरे – बीकेसी मेट्रो मार्गिकेच्या सेवा कालावधीत वाढ केली आहे. त्यानुसार बुधवारी २० नोव्हेंबर रोजी या मार्गिकेवरील सेवा सकाळी ६.३० ऐवजी पहाटे ४ वाजता सुरू होणार असून ही सेवा रात्री १०.३० ऐवजी मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती एमएमआरसीकडून देण्यात आली.

Story img Loader