Mumbai News Live Updates : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून पासून सुरू झाले आहे. आमदार रईस शेख यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीवर भाष्य केले आहे. मुंबई शहर सर्व जाती धर्मियांचे असुन या शहराच्या महापौरपदी पारशी, बोहरी, खोजा, मेमन, पटेल, आगरी, कोळी, मुस्लीम महापौर राहिलेले आहेत. उद्या कोणी खान महापौर झाला तरी तो शहराच्या विकासात योगदान देईल. खानसुद्धा मतदारांनी निवडलेला नगरसेवक असेल, असा दावा समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पुर्व’चे आमदार रईस शेख यांनी बुधवारी विधानसभेत बोलताना केला.

तसेच पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणे निम्म्याने भरली असून, चारही धरणात मिळून एकूण १५. ५६ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा झाला आहे.

मुंबई, मुंबई महानगर, पुणे -नागपूर शहर आणि परिसरातील महत्वाच्या विविध ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Live Updates, 3 July 2025

11:07 (IST) 4 Jul 2025

मतिमंद विद्यार्थ्यांची शाळा धोक्यात; आमदार संदीप जोशींचे मुख्यमंत्र्यांना पत्र… काय केली मागणी?

संस्थेच्या कारभारात अकार्यक्षमता, अपारदर्शकता तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांवर अन्यायाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नियमित मानधन, वेतन इत्यादींबाबत अनेक समस्या आहेत. ...वाचा सविस्तर
11:05 (IST) 4 Jul 2025

फोनवर बोलण्याच्या नादात पडला थेट लिफ्टच्या खड्ड्यात; अंत्यविधीसाठी आला पण स्वतःचा जीव…

पुणे जिल्ह्यातल्या चिखली येथील गोकूळ सोसायटीत राहणारे राजेश हे दोन दिवसांपूर्वी नातेवाईकाच्या एका अंत्यविधीसाठी नागपूरात आले होते. ...अधिक वाचा
10:34 (IST) 4 Jul 2025

शाळकरी मुलीचा विनयभंग करणारा क्रीडा शिक्षक अटकेत

क्रीडा शिक्षक बोराटे याच्याविरुद्ध विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचाारांपासून संरक्षण कायद्यातील कलमांन्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...अधिक वाचा
19:57 (IST) 3 Jul 2025

वीज स्वस्त! पुण्यातील २२ लाख ग्राहकांचे प्रति युनिट ०.८३ रूपये वाचणार

‘महावितरण’च्या घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व संवर्गातील ग्राहकांच्या वीजदरात १ जुलैपासून पाच वर्षांसाठी कपात करण्याचा आदेश राज्य वीज नियमाक आयोगाने दिला आहे. ...सविस्तर बातमी
18:50 (IST) 3 Jul 2025

पाणीपुरीवाल्याच्या मुलाने जेईईमध्ये मिळविले चांगले गुण… थेट घेतली आयआयटीत झेप

कुटुंबाची बेताची आर्थिक परिस्थिती, वडिलांच्या पाणीपुरीच्या व्यवसायातून मिळणारे तुटपूंजे उत्पन्न, त्यातच प्रकृती अस्वस्थ्यामुळे इयत्ता अकरावीत आलेल्या अपयशामुळे खचून न जाता कल्याणमधील हर्ष गुप्ताने (१९) कठोर मेहनत घेतली. ...अधिक वाचा
18:47 (IST) 3 Jul 2025

महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात ‘पॅलिएटिव्ह केअर’ बाह्यरुग्ण सेवा सुरु!

कर्करोग, मधुमेह अशा असंसर्गजन्य आजारांबरोबरच इतर गंभीर किंवा दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त प्रौढ रुग्णांसाठी ही विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. ...अधिक वाचा
18:35 (IST) 3 Jul 2025

ईडीच्या कारवाईत कोट्यावधींचे घबाड; पालिका अधिकारी, विकासक, वास्तुविषारदांचे रॅकेट उघड

या कारवाईत बॅंकेतील १२ कोटी रुपये रक्कम आणि मुदत ठेवी गोठविण्यात आल्या असून २६ लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
18:18 (IST) 3 Jul 2025

Video : धक्कादायक! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न…

भर वाहतुकीच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर गुरुवारी (३ जुलै) दुपारी हा खळबळजनक घटनाक्रम घडला. प्रदीप गोरे (४८, रा. सुंदरखेड, ता. जि. बुलढाणा) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ...सविस्तर बातमी
18:13 (IST) 3 Jul 2025

शिक्षक भरती घोटाळा! शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधीक्षक सलामे यांना अटक…

सलामे यांच्यावर नागपूर पोलिसांत भादंविचे कलम 420, 465, 468, 471, 472, 409, 120 ब, 34 या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...वाचा सविस्तर
17:50 (IST) 3 Jul 2025

युवकाला जिवे मारण्याचा प्रयत्न; तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल

पुण्यातील शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून एका युवकावर कोयत्याने गंभीर हल्ला करण्यात आला. ...अधिक वाचा
17:40 (IST) 3 Jul 2025

प्रभात रस्त्यावर दरोड्याच्या तयारीतील गुन्हेगाराला आठ महिन्यांनी अटक

पुण्यातील प्रभात रस्त्यावर बंद बंगल्यात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात पोलिसांवर हल्ला करणाऱ्या फिरोजखाँ दुल्होत या गुन्हेगाराला नाशिकमधून अटक करण्यात आली. ...सविस्तर बातमी
16:46 (IST) 3 Jul 2025

बोगस कामगारांना मजूर असल्याचे प्रमाणपत्र; संगणक चालकांवर गुन्हे

या प्रकरणी सुनील दयालराव ढोरे (३४) रा. शांतीनगर, राळेगाव तसेच प्रज्वल शिरसकर (२५) रा.कळंब या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ...अधिक वाचा
16:24 (IST) 3 Jul 2025

संतापजनक! सावत्र बापाने नऊ वर्षीय चिमुकल्याचा घेतला जीव, कारण वाचून बसेल धक्का…

अकोट शहरातून २ जुलै रोजी दर्शन पळसकर हा घरातून बेपत्ता झाला होता. त्याच्या आईने अकोट शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. ...वाचा सविस्तर
16:12 (IST) 3 Jul 2025

शासनाचा मोठा निर्णय! वाळू वाहतुकीसाठी चोवीस तास मार्ग मोकळा

महाराष्ट्रात वाळू वाहतुकीसाठी २४ तासांची परवानगी देण्यात आली असून, कृत्रिम वाळू धोरणाचीही घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ...वाचा सविस्तर
16:08 (IST) 3 Jul 2025

रेल्वे प्रवास महाग! नागपूरकरांना २५ रुपये पर्यंतचा फटका!

समाज माध्यमांवर प्रवाशांनी भाडेवाढीबद्दल तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत: भाडे वाढवायला वेळ लागत नाही, पण स्वच्छता, वेळेचे पालन अजूनही ढिलं आहे. ...वाचा सविस्तर
16:01 (IST) 3 Jul 2025

रेल्वे सुटण्याच्या ८ तास आधी आरक्षण चार्ट, प्रवाशांना होणार हे फायदे

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी मोठी सुविधा सुरू केली असून आता ट्रेनचा अंतिम आरक्षण चार्ट गाडी सुटण्याच्या किमान ८ तास आधी ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. ...वाचा सविस्तर
15:48 (IST) 3 Jul 2025

भर पावसाळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष! मेळघाटात पिण्याच्या पाण्‍यासाठी पायपीट…

या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आहे. पण, वीज नाही. विजेअभावी शासकीय कामकाजावर आणि शालेय कामकाजावर देखील परिणाम होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ...सविस्तर बातमी
15:32 (IST) 3 Jul 2025

नागपुरातही दुचाकी टॅक्सीवर झाली होती कारवाई… त्यानंतर झाले असे की…

नागपुरात २०२२ च्या सुरवातीला शासनाने मंजूरी न घेता रॅपीडो कंपनीकडून दुचाकी टॅक्सीची सेवा सुरू केली गेली होती. त्यावर टायगर ऑटोरिक्षा संघटनेने आक्षेप घेत विलास भालेकर यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केले होते. ...सविस्तर बातमी
15:15 (IST) 3 Jul 2025

राज्याच्या शालेय शिक्षणाची वेगाने अवनती; जाधव समिती रद्द करा, मराठी चळवळीची मागणी

जाधव समितीचा शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी, वैश्विक मराठी परिवारच्या वतीने प्रमुख संयोजक डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केली ...सविस्तर वाचा
15:14 (IST) 3 Jul 2025

गळक्या छताखाली रुग्णांवर उपचार ! शहापूर उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात गळती

आधीच अपुऱ्या आरोग्य सोयींमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांना आता गळक्या छताखाली उपचार घ्यावे लागत आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. ...सविस्तर वाचा
15:02 (IST) 3 Jul 2025

गीतेचे अध्याय मुखोद्गत करणाऱ्या डोंबिवलीतील अर्णव वैद्यचा श्रृंगेरी येथे सन्मान, ओंकार शाळेचा विद्यार्थी

मागील दहा वर्षाच्या काळात कल्याण, डोंबिवली परिसरातील काही नागरिकांनी गीता पठण स्पर्धेत श्रृंगेरी येथे जाऊन यश संपादन केले आहे. ...वाचा सविस्तर
14:51 (IST) 3 Jul 2025

नागपूरच्या मध्यवर्ती भागात देहव्यापार अड्डा; सेंट्रल एव्हेन्यूवरून विदेशी महिलेची सुटका

पोलिसांनी सोडविलेली पिडीत महिला उझबेकिस्तान येथील रहिवासी आहे. नवी दिल्लीतील एका दलाला मार्फत ती दोन दिवसांपूर्वी विमानाने नागपूरात आली होती. ...वाचा सविस्तर
14:43 (IST) 3 Jul 2025

सोन्याच्या दरात प्रत्येक तासात बदल… प्रथम वाढले, त्यानंतर घसरण…

गुरूवारी (३ जुलै २०२५) सोन्याचे दर बाजार उघडल्यावर पहिल्या तासातच वाढण्याचे संकेत होते. परंतु त्यानंतरच्या तासात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. ...वाचा सविस्तर
14:02 (IST) 3 Jul 2025

प्राध्यापक, विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी… १२ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ई डिजिटल ग्रंथालय…

राज्यामध्ये गतवर्षी सुरू करण्यात आलेल्या १० वैद्यकीय महाविद्यालयांसह १२ महाविद्यालयांमध्ये ई - डिजिटल ग्रंथालय उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ...अधिक वाचा
13:53 (IST) 3 Jul 2025

‘चल गं सखे, चल गं सखे पंढरीला…’ भाविकांसाठी थेट रेल्वे धावणार, बसचेही नियोजन….

भाविकांना पंढरपूरला जाणे सोयीस्कर व्हावे यासाठी विशेष गाड्या सोडण्याचे रेल्वे व एसटी महामंडळाकडून नियोजन केले आहे. ...सविस्तर वाचा
13:42 (IST) 3 Jul 2025

डोंबिवलीत भरधाव वाहनांच्या धडकेत दोन वृध्द महिला गंभीर जखमी

वाहन चालक घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेले. याप्रकरणी मानपाडा आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...अधिक वाचा
13:33 (IST) 3 Jul 2025

भंडाऱ्यात संततधार! गोसेखुर्द धरणाची नऊ दारे उघडली; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रण करिता आज ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नऊ वक्रद्वारे खुली करून अंदाजे ५३० क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. ...वाचा सविस्तर
13:13 (IST) 3 Jul 2025

सावधान! जिल्ह्यातील हे मार्ग बंद; वाहतूक केली वळती…

वर्धा उपविभागीय अधिकारी कार्यालयाने पुलावरून होणाऱ्या वाहतुकीचा धोका टाळण्यासाठी दुचाकी वाहतूक व पायदळ रहदारी टाळावी म्हणून आवश्यक कार्यवाही करण्याचे सूचित केले. ...अधिक वाचा
12:50 (IST) 3 Jul 2025

वाघांचे मृत्यू: मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्प संचालकांच्या परिषदेत काय ठरले?

मध्य भारतातील महाराष्ट्र, ओडिसा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यातील १९ व्याघ्र प्रकल्पांचे क्षेत्र संचालकांची प्रादेशिक परिषद १ व २ जुलै रोजी चंद्रपूर येथील वन अकादमी येथे पार पडली. ...सविस्तर वाचा
12:49 (IST) 3 Jul 2025

घरकुल यादीत घोळ, बेकायदेशीर वाळूची उचल करणाऱ्यांना अभय कोणाचे?

या प्रकरणात २६ जून रोजी तक्रारदार शेंडे यांच्यासह तहसील कार्यालयातील दोन कर्मचारी स्मिता शेंडे व नौसिया खान तसेच ट्रक चालक सुमित नारनवरे यांना तहसील कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. ...अधिक वाचा

nagpur mumbai pune latest marathi news today in marathi

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह अपडेट्स