मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र पाठवून दिलगिरी व्यक्त केली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मागणीबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना उद्देशून वादग्रस्त विधान केले होत़े  आरक्षण देण्यासाठी ‘दिल्लीला जा, नाहीतर मसणात जा, देता येत नसेल तर घरी जा, स्वयंपाक करा’ असे वक्तव्य पाटील यांनी केले होते. त्यावर गेले काही दिवस सर्व स्तरांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या वक्तव्याबद्दल पाटील यांच्यावर टीका झाली होती.

nashik bjp marathi news, bjp dindori lok sabha election 2024
कोणता समाज, घटक नाराज आहे ? दिंडोरी लोकसभेसाठी भाजप निरीक्षकांकडून चाचपणी
Jayant Patil on Ajit Pawar comparision to Modi- Shah
‘तुलना कुणाशी करायची, याचं भान…’, अजित पवारांच्या ‘त्या’ दाव्यानंतर जयंत पाटील यांचा टोला
jayant patil and ajit pawar
अर्थसंकल्पातील तरतुदींवरून जयंत पाटील आक्रमक; सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “बाटाचा बूट…”
What Jitendra Awhad Said?
“…तर अजित पवार शरद पवारांच्या पायाशी येऊन बसतील”, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य

या पार्श्वभूमीवर पाटील यांनी महिला आयोगाला पत्र पाठवून दिलगिरी व्यक्त केली. आयुष्यातील ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर ‘स्वयंसिद्धा’, ‘हेल्पर्स ऑफ हँडीकँप,’,‘सावली’, ‘आई’, ‘संवेदना व वात्सल्य’ सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठय़ा पक्षाचा मी प्रदेश अध्यक्ष आहे. महाराष्ट्र विधानसभेत भाजपच्या १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रिया सुळे व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते, यासारखे आयुष्यात दु:ख नाही, असे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.