scorecardresearch

Maharashtra Budget 2023-2024 : पीकविम्याबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; आता शेतकऱ्यांना द्यावे लागणार केवळ ‘एवढे’ रुपये

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला.

Maharashtra Budget news
फोटो – विधानसभा युट्यू चॅनेल

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पीकविम्याबाबत मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांना आता केवळी १ रुपयांत पीकविमा काढता येईल, असे ते म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार, अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा – Maharashtra Budget 2023-2024 Live: महिलांसाठी एसटी प्रवासात सरसकट ५० टक्के सूट; राज्य सरकारची मोठी घोषणा!

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

यावेळी बोलताना ते म्हणाले, “आज हवामान बदल, अवकाळी पाऊस, अवर्षण अशा असंख्या समस्यांनी अन्नदाता ग्रासला आहे. शाश्वत शेतीसाठी अनेक उपाय होत असले, तरी त्याला हक्काच्या मदतीची गरज आहे. कायम शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचीच आमची भूमिका आहे. यावर्षी अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल.”

शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात पिकविमा

पुढे बोलताना त्यांनी आता शेतकऱ्यांना १ रुपयात पीकविमा काढता येईल अशी घोषणाही केली. “आधीच्या योजनेनुसार पिकविम्याच्या हप्त्याची दोन टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून घेतली जात होती. मात्र, आता पिकविम्याच्या हप्त्याचा कोणताही भार शेतकर्‍यांवर लादला जाणार नाही. शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयात पिकविमा काढता येईल. यासाठी ३३१२ कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली”

हेही वाचा – नागालँडमध्ये नवाब मलिकांना तुरुंगात टाकणाऱ्या भाजपाबरोबर जाऊन का बसलात? अजित पवार म्हणाले…

शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला १२ हजार रुपये

यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार असल्याची घोषणाही केली. “अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून साकारलेला प्रधानमंत्री कृषीसन्मान निधी योजनेत राज्य सरकारच्या अनुदानाची भर घालण्यात येईल. त्यानुसार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ आम्ही जाहीर करत आहोत. या योजनेत केंद्र सरकारच्या प्रतिवर्ष प्रतिशेतकरी ६ हजार रुपयांमध्ये राज्य सरकार आणखी ६ हजार रुपयांची भर घालेल. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी १२ हजार रुपये मिळतील. याचा लाभ १ कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना होणार आहे. त्यासाठी २०२३-२४ साठी ६ हजार ९०० कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद केली जाईल,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 14:57 IST
ताज्या बातम्या