scorecardresearch

महिलांसाठी आनंदाची बातमी! राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकिटदरात मिळणार ५० टक्के सवलत; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला.

Maharashtra Budget 2023
फोटो – महाराष्ट्र विधिमंडळ युट्यूब चॅनेल

Maharashtra Budget 2023-2024 : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२३-२४ अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा देण्याच्या प्रयत्न शिंदे सरकारकडून करण्यात आल. तसेच, महिला आणि शेतकऱ्यांसाठीही या अर्थसंकल्पाद्वारे अनेक महत्त्वाच्या घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

हेही वाचा – Maharashtra Budget 2023-2024 : पीकविम्याबाबत देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; आता शेतकऱ्यांना द्यावे लागणार केवळ ‘एवढे’ रुपये

महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट

यावेळी बोलताना उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना एसटी प्रवासात ५० टक्क्यांची सूट देण्याची घोषणा केली. तसेच महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण लागू करणार असल्याचेही ते म्हणाले. पुढे बोलताना ”कालच, महिला दिन साजरा करण्यात आला. देशीच प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते. त्यासाठी आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसेच मुलींच्या सक्षमीकरणाकरता ‘लेक लाडकी’ ही नवी योजना सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

महिलांसाठी ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना

शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने ५० वसतीगृहांची निर्मिती करण्यात येईल. तसेच लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी ‘स्वाधार’ आणि ‘उज्वला’ या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना सुरू करण्यात येईल. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन आदी सेवा पुरवण्यात येईल, अशी घोषणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हेही वाचा – शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा, दरवर्षी मिळणार ‘इतके’ हजार रुपये

अंगणवाडी सेविकांबाबतही फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

अंगणवाडी सेविकांबाबतही फडणवीस यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. अंगणवाडी सेविकांचे मानधन ८३२५ वरुन १० हजार रुपये करण्यात येईल. तसेच मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ५९७५ वरुन ७२०० रुपये करण्यात येईल, अशी घोषणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. याबरोबरच अंगणवाडी मदतनिसांचे मानधन ४४३५ वरुन ५५०० रुपये करण्यात येईल आणि अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची २० हजार पदे भरणार, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-03-2023 at 15:53 IST