नगरसेवकांच्या संख्येत वाढ ; मुंबईपाठोपाठ पुणे, नागपूरमध्ये सर्वाधिक नगरसेवक

सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ व कमाल १७५ इतकी आहे

मुंबई : गेल्या दहा वर्षांमध्ये शहरी व निमशहरी भागातील लोकसंख्येत झपाटय़ाने वाढ झाल्याने मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांमधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाने मुंबईपाठोपाठ पुणे आणि नागपूरमध्ये नगरसेवकांची संख्या झाली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीने राजकीय फायद्याचे गणित डोळ्यासमोर ठेवूनच सदस्यसंख्येत वाढ के ली आहे.

राज्यात सध्या मुंबईसह २७ महापालिका आणि ३७९ नगरपालिका- नगरपंचायती आहेत. दर १० वर्षांनी होणाऱ्या जनगणनेच्या आधारे नगरविकास विभागातर्फे  महापालिका- नगरपालिकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात नगरसेवकांची संख्या निश्चित के ली जाते. सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ व कमाल १७५ इतकी आहे. तर नगरपरिषदांमधील सदस्य संख्या किमान १७  व कमाल ६५ इतकी आहे. राज्यातील  वाढत्या नागरीकरणामुळे तसेच  त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी तसेच या भागात विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठ नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिके च्या सदस्यसंख्येत वाढ करण्यात आलेली नाही. मुंबईत विद्यमान २२७ ही सदस्यसंख्या कायम राहील  महापालिका- नगरपालिकांमधील सद्याची नगरसेवकांची संख्या ही सन २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर निश्चित करण्यात आलेली आहे. करोनाच्या साथीमुळे सन २०२१ च्या जनगणनेचे निष्कर्ष अजून जाहीर झालेले नाहीत. या जनगणनेस आणखी काही कालावधी लागणार आहे.

त्यामुळे गेल्या दहा वर्षांत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहीत धरुन महानगरपालिका व नगरपरिषदांच्या किमान सदस्य संख्येत सरासरी १७ टक्के  वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

लोकसंख्या आणि नगरसेवक यांचे सूत्र

महानगरपालिका :

३ ते ६ लाखापर्यंत लोकसंख्या असलेल्या महापालिकेत किमान ७६ व कमाल ९६ नगरसेवक असतील.

६ ते १२ लाखांपर्यंत लोकसंख्या- किमान ९६ – कमाल १२६

१२ ते  १४ लाखापर्यंत लोकसंख्या – किमान १२६ –  कमाल १५६

 २४ ते ३० लाखापर्यंत लोकसंख्या – किमान १५६ – कमाल १६८

 ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या – किमान १६८ – कमाल १८५ 

नगरपालिका :

अ वर्ग – ४० ते ७५

ब वर्ग – २५ ते ३७

क वर्ग – २० ते २५

महापालिकांमधील नवीन सदस्यसंख्या

पुणे – १७३, नागपूर – १५६ ठाणे – १४२, पिंपरी-िंचंचवड – १३९,कल्याण-डोंबिवली – १३३ नाशिक – १३३, वसई-विरार – १२६ औरंगाबाद – १२६ नवी मुंबई – १२२ सोलापूर – ११३ मीरा-भाईंदर – १०६ भिवंडी-निजामपूर – १०१ अमरावती – ९८ मालेगाव – ९५ नांदेड-वाघाळा – ९२ कोल्हापूर -९२ अकोला – ९१ पनवेल – ८९ उल्हासनगर – ८९ सांगली-मिरज-कुपवाड – ८९ जळगाव – ८६ धुळे – ८५ लातूर – ८१ नगर – ७९ चंद्रपूर – ७७ परभणी – ७६

निवडणुका लांबणीवर

मुदत संपलेल्या पाच महानगरपालिका, मुदत संपणाऱ्या मुंबईसह दहा महानगरपालिका आणि ३००च्या आसपास नगरपालिकांच्या निवडणुका नोव्हेंबर ते फे ब्रुवारी या कालावधीत अपेक्षित आहेत. नव्याने नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रभागांची फे ररचना करावी लागेल. यामुळे निवडणुका लांबणीवरच पडण्याची चिन्हे आहेत

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra cabinet decision to increase corporators in all municipal corporations except mumbai zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही