मुंबई : खातेवाटप, मंत्र्यांची संख्या यावरून महायुतीमध्ये घोळ कायम राहिल्याने शनिवारी प्रस्तावित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आता रविवारी नागपूरमध्ये होईल असे सांगितले जाते. मात्र त्याला अधिकृत दुजोरा देण्यातआलेला नाही. भाजप नेत्यांना अजूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करावी लागत असताना भाजपमध्येही काही नावांवर आक्षेप असल्याचे समजते. दरम्यान शिंदे यांनी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दोन आठवडे तर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडून आठवडा उलटला तरीही संपूर्ण सरकार आकारास आलेले नाही. सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत सूतोवाच केले होते. फडणवीस यांनी नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी भाजपच्या मंत्र्यांचे नावे आणि मित्रपक्षांच्या खात्यांवर चर्चा केली होती. शनिवारी विस्तार होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे संकेत दिले होते. पण शुक्रवारी रात्रीपर्यंत विस्ताराबाबत काहीच निर्णय झाला नव्हता. विस्तार रविवारी दुपारी नागपूरमध्ये होईल, असे संकेत सरकारी सूत्रांकडून देण्यात आले.

Deputy Chief Minister Eknath Shinde orders to open MSRDC office for new Mahabaleshwar project satara news
नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यालय सुरू करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Pimpri Municipal Corporation, transfers officers,
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?
Nagpur municipal corporation
नागपूर : मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उपद्रव शोध पथक सक्रिय
tigers missing tipeshwar wildlife sanctuary
टिपेश्वर अभयारण्यातील दोन वाघ बेपत्ता?
Ganesh Naik talk about human and wildlife conflict and Solution plan
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले “वाघ मुंबईपर्यंत आले तर काय…”
some bad decisions happened on eknath shinde tenure as chief minister says forest minister ganesh naik
एकनाथ शिंदे यांच्या कालखंडात काही चुकीच्या गोष्टी घडल्या; वनमंत्री गणेश नाईक यांचे विधान
Local villagers experienced thrill fight between two tigers in Wasada Makta area
‘त्या’ दोन वाघांमध्ये झुंजीचा थरार; रक्ताचा सडा, पण…

हेही वाचा : Kirit Somaiya : दादरमधल्या हनुमान मंदिरावरुन राजकारण; किरीट सोमय्यांचं रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र, “अनेक दशकं…”

शिंदे यांच्याशी चर्चा

महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर एकमत न होऊ शकल्याने विस्तार लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येते. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे अजूनही समाधान झालेले नाही. यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे यांची भेट घेतली. फडणवीस यांनीही शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येते. महायुतीत शिवसेनेला (शिंदे) १२ किंवा १३ मंत्रीपदे देण्याची भाजपने तयारी दर्शविली आहे. पण खातेवाटपाचा तिढा कायम होता. शिंदे यांना नगरविकासबरोबर महसूल खाते हवे आहे. महसूल सोडण्याची भाजपची तयारी नाही. याशिवाय शिंदे यांच्या काही माजी मंत्र्यांच्या फेरसमावेशास भाजपने आक्षेप घेतल्याने शिंदे यांनी नापसंती व्यक्त केली आहे.

दोन्हीकडेही तयारी

शनिवारी विस्तार होण्याची शक्यता गृहीत धरून राजभवनवर सारी तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने शनिवारी विस्तार करण्याची सूचना केल्यास सारी तयारी झाल्याचे राजभवनातून सांगण्यात आले. सोमवारपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची नागपूरला जाण्याची लगबग सुरू झाली आहे. रविवारी चहापानाच्या पूर्वी दुपारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची योजना आहे. नागपूरमध्ये शपथविधीची तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : विकासासाठी धोरणांची अंमलबजावणी; एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पूर्वी भुजबळांचा शपथविधी नागपूरमध्ये

सरकार स्थापनेनंतर नवीन मंत्रिमंडळाचा विस्तार आतापर्यंत मुंबईतच होण्याची परंपरा आहे. प्रथमच नागपूरमध्ये नवीन सरकारचा विस्तार होत आहे. शिवसेनेतील फुटीनंतर १९९१ मध्ये छगन भुजबळ आणि राजेंद्र गोडे या दोघांचा नागपूरमध्ये शपथविधी झाला होता.

महत्त्वाच्या विभागांचा आग्रह

●तिन्ही पक्षांना पायाभूत सुविधांशी संबंधित खाती हवी आहेत. गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम या भाजपकडे असलेल्या खात्यांवर राष्ट्रवादीचे लक्ष आहे.

●भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून अद्याप पक्षाच्या मंत्र्यांची नावे मुंबईत कळविण्यात आलेली नाहीत. यामुळे विस्तारास विलंब होत असल्याचे भाजपच्या सूत्राकडून सांगण्यात आले.

हेही वाचा : शेतीमालाच्या हमीभावाने खरेदीला मुदतवाढ; जाणून घ्या, सोयाबीन, मूग, उडदाची खरेदी कधीपर्यंत

●भाजपमध्ये ज्येष्ठ नेत्यांच्या समावेशाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार नाही, असे संकेत प्राप्त होत आहेत.

Story img Loader