मुंबई: राज्यात कर्करोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी 100 पेक्षा जास्त टाटा सारखी रुग्णालय उभी करावी लागतील. या आजारावर मात करण्यासाठी राज्य शासनाने तीन स्तरावर आरोग्य रचना उभी करण्याचे ठरविले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

राज्यात कॅन्सरची संख्या वाढली आहे. त्यासाठी 26 ठिकाणी रेडिओथेरपी निर्माण केल्या जातील. कॅन्सरच्या पेट स्कॅन तसेच औषधसुविधांचा महात्मा फुले जन आरोग्य सेवेत समावेश केला जाईल. असे आबिटकर यांनी सांगितले.

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाने गेल्या वर्षी राबवलेल्या कॅन्सर तपासणी मोहिमेत १६७७ कॅन्सर रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई शहरातील वाढते प्रदूषण हे फुफुसाच्या कॅन्सर साठी कारणीभूत ठरू लागले आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगांचे प्रमाण 57% निवडले आहे. निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुख, गर्भाशय, आणि स्तन कॅन्सर झालेल्या रुग्णांची संख्या आहे. महिलांमध्ये स्तन कॅन्सरचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे शासनाने टाटा सह खाजगी व शासकीय रुग्णालयांना कॅन्सर उपचारासाठी तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी लक्षवेधी शिवसेना ठाकरे पक्षाच्या सुरेश प्रभू यांनी मांडली.

या लक्षवेधीवर बोलण्यासाठी अमीन पटेल, सुलभा खोडके, बाबासाहेब देशमुख, किशोर पाटील, भास्कर जाधव, राजकुमार बडोले, समीर कुणावर, देवयानी फरांदे या सदस्यांनी भाग घेतला. कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल या सर्व सदस्य चिंता व्यक्त केली. या रोगाच्या प्राथमिक औषध उपचाराची तरतूद केवळ दहा दिवसाचीच आहे. त्यानंतर या रुग्णांनी काय करावे असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. नागपूर मध्ये तर या रुग्णांच्या उपचारासाठी एक एक महिना वाट पाहावी लागते. अशावेळी त्या रुग्णाचा कॅन्सर वाढत असल्याचे दिसून आले आहे. कोकणात केमिकल झोन जाहीर झाल्यापासून कॅन्सर रुग्णाची संख्या वाढल्याचा गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला. राज्याच्या आरोग्य विभागा कडे केवळ आठ कॅन्सर निदान व्हॅन आहेत. कॅन्सर तपासणी करण्यास नागरिक घाबरत असल्याची बाबही समोर आली.

प्राथमिक स्तरावर रोगाचे निदान होत नसल्याने या रोगाचे प्रमाण वाढते. तपासणी व्हॅनची संख्या कमी आहे.ती वाढवली जाईल असं अबिटकर यांनी सांगितले मुंबईत जगातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे मुंबई ही मेडिकल टुरिझम झाली आहे. मुंबईत कॅन्सर उपचार साठी पालिका हॉस्पिटल बांधत आहे पण सरकार वैद्यकीय कर्मचारी व निधी सरकार देत नाही. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी तालुका जिल्हा आणि राज्य पातळीवर उपचार रचना तयार करीत आहे. उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयांनी पैसे मागितल्यास फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असा इशाराही आबिटकर यांनी दिला. ३६ जिल्ह्यात तपासणी व्हॅन सुरू केल्या जातील असेही अधिकार यांनी सांगितले.