मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. त्यानुसार बॅचलर ऑफ डिझाईन (बी. डिझाईन) या अभ्यासक्रमाची सीईटी ५ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. बी. डिझाईनसाठी राज्यभरातून ७ परीक्षा केंद्रावर १ हजार ७१८ विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत.

बी. डिझाईन या अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी यंदा १ हजार ७१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यावर्षीच्या नोंदणीमध्ये ७ अनाथ विद्यार्थी व १६ दिव्यांगांचा समावेश आहे. ही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने राज्यातील सात परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. मागील चार वर्षांमध्ये या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत आहे.

बी.डिझाईन या अभ्यासक्रमासाठी २०२३-२४ मध्ये ७०२, तर २०२४-२५ मध्ये १ हजार १२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. दरम्यान, या अभ्यासक्रमासाठी २०२५-२६ मध्ये १ हजार ३२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.