मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्षा) उच्च शिक्षणाअंतर्गत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी तीन वर्षीय विधि, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन व मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन या तीन अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस १३ जुलैपर्यंत दुसरी मुदतवाढ देण्यात आली आहे. सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

बीपीएड, एमपीएड व तीन वर्षीय एलएलबी या अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेशाची नोंदणी ११ जूनपासून सुरू झाली होती, पहिली मुदतवाढ ८ जुलैपर्यंत देण्यात आली होती. आता या तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीसाठी दुसऱ्यांदा ९ ते

१३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या तिन्ही अभ्यासक्रमांस मिळून आजपर्यंत ५९ हजार ११७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करताना पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र व आपल्या स्वाक्षरीची प्रतिमा दिलेल्या निश्चित आकारात जेपीजी किंवा जेपीईजी स्वरुपात स्कॅन करावी. तसेच या अभ्यासक्रमाशी संबंधित सर्व शैक्षणिक व इतर कागदपत्रे, याची सविस्तर यादी सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. ही सर्व कागदपत्रे स्कॅन करून निश्चित आकारात पीडीएफ करून ऑनलाईन नोंदणी करताना अपलोड करावी.

आतापर्यंत झालेली प्रवेश नोंदणी

अभ्यासक्रम सीईटी दिलेले विद्यार्थी झालेली नोंदणी

बीपीएड४,९६५४,२४८

एमपीएड२,१३४१,८००

तीन वर्षीय एलएलबी६९,४७३५३,०६९