मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: छायाचित्रकार असतानाही राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांवर त्यांचा फोकस का वळला नाही असा सवाल करीत राज्य शासनाने या चित्रकार आणि शिल्पकारांना मदत करावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार आशीष शेलार यांनी केली.

राज्यातील चित्रकार आणि शिल्पकारांच्या शिष्टमंडळाने आमदार आशीष शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगर्तंसह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. जयंत पटेल, रमेश थोरात यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश होता.

राज्यात सुमारे १० हजार चित्रकार, शिल्पकार दरवर्षी प्रदर्शन करून आपली कला सादर करतात. तसेच त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पण करोना काळात गेल्या दीड वर्षात प्रदर्शने होऊ शकली नाहीत. आपल्या राज्याला, देशाला कलेच्या माध्यमातून समृद्ध करणाऱ्या या कलावंतांचा अशा वेळी राज्य सरकारने संवेदनशील पणे विचार करण्याची गरज  होती.

त्या मंत्र्यांची हकालपट्टी करा ज्यांचा जावई अंमली पदार्थ प्रकरणात पकडला गेला त्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. अशा मंत्र्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, असे शेलार म्हणाले.