मुंबई : महाराष्ट्र दिनानिमित्त शुक्रवार, १ मे रोजी दादरच्या शिवाजी पार्कवर परेड आयोजित केली आहे. यानिमित्त दादरसह आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मुंबई वाहतूक पोलिसांनी अनेक बदल केले आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी अधिसूचना जारी केली आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यत वाहतुकीत बदल केले आहेत.
अ) वाहतुकीस प्रवेश बंद व एक दिशा मार्ग
* दक्षिण केळूस्कर व उत्तर केळूस्कर मार्ग *एस. के. बोले रोड हा सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपासून पोर्तुगिज चर्च जंक्शनपर्यंत एक दिशा मार्ग * स्वातंत्रवीर सावरकर मार्ग हा सिध्दीविनायक जंक्शन ते येस बँक जंक्शनपर्यत. * सिध्दीविनायक जंक्शन येथून स्वातंत्रवीर सावकर मार्गे पश्चिम उपनगराकडे जावू इच्छिणाऱ्या वाहन चालकांनी सिध्दीविनायक जंक्शन येथे उजवे वळण घेवून, एस. के. बोले रोडने पोर्तुगिज चर्च जंक्शन येथे डावे वळण घेवून गोखले रोड मार्गे गडकरी जंक्शन, एल. जे. रोड, राजा बडे चौक येथून पश्चिम उपनगराकडे प्रस्थान. *येस बँक जंक्शन चेथून सिध्दीविनायक मंदिर जंक्शनपर्यंत प्रवेश बंद केल्याने, दक्षिण मुंबईकडे जावू इच्छिणाऱ्या वाहनचालकांनी एस. व्ही. एस. रोडने येस बँक जंक्शन येथे डावे वळण घेवून पांडुरंग नाईक मार्गे राजा बडे चौक येथे आल्यानंतर उजवे वळण घेवून एल. जे. रोड, गडकरी जंक्शन मार्गे गोखले रोड मार्गाने दक्षिण मुंबईकडे जावे.
ब) नो-पार्किंग
* केळूस्कर मार्ग दक्षिण व उत्तर.
* पांडुरंग नाईक मार्ग.
* एन. सी. केळकर मार्ग, गडकरी जंक्शनपासून कोतवाल गार्डनपर्यंत.
क) पोलीस, पी. डब्ल्यू. डी. आणि इतर शासकीय विभागाच्या वाहनांकरीता पार्किंग
* स्वातंत्रवीर सावरकर स्मारक
*वनिता समाज सभागृह.
*महात्मा गांधी जलतरण तलाव.
* कोहिनूर सार्वजनिक वाहन तळ, एन. सी. केळकर रोड, दादर (प.), मुंबई.
ड) आमंत्रितांसाठी वाहतुक सूचना
* दक्षिण व मध्य मुंबईकडून टिळक उड्डाणपुलामार्गे शिवाजी पार्क येथे येणाऱ्या आमंत्रितांसाठी मार्ग- टिळक उड्डाणपूल मार्गे कोतवाल गार्डन सर्कल येथे उजवे वळण घेवून एन. सी. केळकर मार्गे गडकरी जंक्शन समोरुन मीनाताई ठाकरे पुतळा येथे डावे वळण घेवून केळूस्कर मार्ग दक्षिणेकडे वळण घेवून शिवाजी पार्क प्रवेशद्वार क्रमांक १ येथून प्रवेश करून परेड मैदान असा मार्ग आहे.
* दक्षिण मुंबईकडून डॉ. ॲनी बेझंट रोड मार्गे शिवाजी पार्क थेथे येणाऱ्या आमंत्रितांसाठी मार्ग- दक्षिण मुंबईकडून डॉ. ॲनी बेझंट मार्ग सेन्च्युरी जंक्शन येथून सरळ स्वांतत्रवीर सावरकर मार्ग सिध्दीविनायक मंदिर जंक्शन ते वसंत देसाई चौक (केळूस्कर दक्षिण जंक्शन) येथे उजवे वळण घेवून शिवाजी पार्क प्रवेशद्वार क्रमांक ०१ येथून प्रवेश करून परेड मैदान असा मार्ग आहे.
*पश्चिम उपनगराकडून माहीम ओल्ड कॅडल रोडने शिवाजी पार्क येथे येणाऱ्या आमंत्रितांसाठी मार्ग- पश्चिम उपनगराकडून येणाऱ्या आमंत्रितांनी माहीम जंक्शन ओल्ड कॅडल रोड हिंदुजा हॉस्पीटल समोरुन स्वातंत्रवीर सावरकर मार्गे दक्षिण वाहिनीने वसंत देसाई चौक (केळूस्कर दक्षिण जंक्शन) येथे डावे वळण घेवून शिवाजी पार्क प्रवेशद्वार क्रमांक १ येथून प्रवेश करून परेड मैदान असा मार्ग आहे. तसेच पश्चिम उपनगराकडून माहीम एल. जे. रोडने शिवाजी पार्क येथे येणाऱ्या पश्चिम उपनगराकडून माहीम चर्च समोरून लेडी जमशेदजी मार्गे राजा बडे चौकातून पुढे – गडकरी चौक – उजवे वळण – एन. सी. केळकर मार्ग – मिनाताई ठाकरे पुतळा येथे डावे वळणे घेवून शिवाजी पार्क प्रवेशद्वार क्रमांक १ येथून प्रवेश करून परेड मैदान असा असेल.
* संचलन
मार्ग
संचलन, शिवाजी पार्क मैदानापासून सुरू होऊन प्रवेशद्वार क्रमांक ५ मधून बाहेर पडून डावे वळण घेवून केळूस्कर मार्ग उत्तर ते सी. रामचंद्र चौक-डावे वळण – स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, दक्षिण वाहिनी ते संगितकार वसंत देसाई चौक (केळूस्कर रोड दक्षिण जंक्शन) ते उजवे वळण घेवून नारळी बाग येथे समाप्त होईल. यामुळे सर्व वाहन चालकांनी सकाळी ६ ते दुपारी १२ पर्यंत वर नमुद रस्त्याने प्रवास करणे टाळावे जेणेकरून गैरसोय होणार नाही. तसेच याबाबत ठिकठिकाणी बोर्ड/चिन्हाने असून, प्रत्येक जंक्शन/सिग्नलवर वाहतूक पोलिसांचीही नेमणूक केली आहे.
विनाकारपास नागरिकांकरीता सूचना
१ मे रोजी परेड संचलनाचे वेळी विनाकारपास स्थानिक व इतर नागरिकांनी आपली वाहने मुंबई महानगपालिकेच्या कोहिनूर सार्वजनिक वाहनतळ, जे. के. सावंत मार्ग, दादर (प.) येथे उभे करावे.
