मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १५० दिवसाच्या कार्यक्रमा अतंर्गत ई गव्हर्नन्स मध्ये जनतेसाठी आमूलाग्र बदल करणाऱ्या कार्यालय प्रमुखांच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या, शनिवारी गौरव केला जाणार आहे. जळगाव, ठाणे, धारशिव, लातूर, कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, ठाणे, नागपूर, अकोला, पुणे (ग्रामीण) रत्नागिरी जिल्हयांचे पोलिस अधिक्षक आणि पनवेल, पुणे, उल्हासनगर, नवी मुंबई, अमरावती पालिकांच्या आयुक्तांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रशासकीय पातळीवरील कामांमध्ये गती आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगोदर १०० दिवसाचा आणि नंतर १५० दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी ई गव्हर्नन्स प्रणाली महत्वाची ठरते. ही प्रणाली अद्यावत, गतीमान व लोकभिमुख करण्यास प्राधान्य देणाऱ्या जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, पालिका आयुक्त यांचा सन्मान तर केला जाणार आहे.
त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त, पोलिस महानिरीक्षक, पोलिस आयुक्त, संचालक, शासकीय मंडळे व कंपन्या, मंत्रालयीन विभाग, सचिव, शासकीय अस्थापना, विद्यापीठे, स्वायत्त संस्था, यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
कौशल्य विकास विभागाच्या अप्पर सचिव, मनिषा वर्मा, अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर (सार्वजनिक बांधकाम) सचिव, विजय वाघमारे (आदिवासी विभाग) डाॅ. अनुपकुमार यादव, सचिव ( महिला विकास) , अनिल डिग्गीकर (अन्न व नागरी पुरवठा) सचिव, डाॅ. पी अनबलगन (उद्योग), आय. ए. कुंदन (कामगार), आभा शुक्ला (उर्जा विभाग) ,एकनाथ डवले (ग्रामविकास) व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालक, सतीश सुर्यवंशी, महिला व बाल विकास आयुक्त, नयना गुंडे, नगररचना व मूल्य निर्धारण संचालक, जितेंद्र भोपळे यांचा समावेश आहे.
