राज्य सरकारकडून ५ कोटींची मदत योजना ; करोनामुळे आर्थिक संकटात सापडलेले कलाकार

या योजनेंतर्गत ५० हजार कलाकारांना व ८४७ कलापथकांना अर्थसाहाय्य के ले जाणार आहे.

मुंबई : करोना साथरोगाचा परिणाम म्हणून आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलाकार व कलासमूहांना ३५ कोटी रुपयांची मदत योजना जाहीर करून दिलासा देण्याचा राज्य सरकारने प्रयत्न के ला आहे. या योजनेंतर्गत ५० हजार कलाकारांना व ८४७ कलापथकांना अर्थसाहाय्य के ले जाणार आहे.

देशात व राज्यात करोना साथरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करावी लागली होती. या कालावधीत सर्व प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली होती. गेल्या दीड वर्षांपासून कला सादरीकरण नाही. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे, हेच के वळ ज्यांचे उपजीविके चे साधन आहे, त्यांची आर्थिक कुं चबणा झाली. राज्य सरकारने करोनामुळे ज्यांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला, अशा संघटित-असंघटित क्षेत्रातील घटकांना काही आर्थिक मदत देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न के ला. त्याच धर्तीवर राज्यातील प्रयोगात्मक कलाप्रकारातील कलाकारांना व कलासमूहांना एकरकमी कोविड दिलासा पॅके ज जाहीर केले आहे.

या योजनेंतर्गत जिल्हाधिकारी व सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक यांच्या स्तरावर लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करण्यासाठी समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या योजनेची ५० दिवसांत अंमलजावणी पूर्ण करायची आहे. पर्यटन व सांस्कृतिक विभागाने आदेश जारी के ला आहे.

५० हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपये प्रयोगात्मक कलाप्रकारातील कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे ५० हजार कलाकारांना २८ कोटी रुपये मदत देण्यात येणार आहे. तर कलापथकांना ६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य जाहीर करण्यात आले आहे. त्यात शाहिरी, खडीगंमत, संगीत बारी, पूर्णवेळ तमाशा फड, हंगामी तमाशा फड, दशावतार, नाटक, झाडीपट्टी, विधिनाटय़, टुरिंग टॉकीज यांचा समावेश आहे. कालाकारांच्या व संस्थांच्या निवडीशी संबंधित प्रशासकीय खर्च म्हणून एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra government 5 crore relief scheme for artists found in financial crisis due to corona zws

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प